IND vs AUS 3rd ODI : तिसर्‍या वनडेत शुभमन गिलसह ५ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता; कोणाला मिळणार संघात स्थान

171
IND vs AUS 3rd ODI : तिसर्‍या वनडेत शुभमन गिलसह ५ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता; कोणाला मिळणार संघात स्थान
IND vs AUS 3rd ODI : तिसर्‍या वनडेत शुभमन गिलसह ५ खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता; कोणाला मिळणार संघात स्थान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. (IND vs AUS 3rd ODI) टीम इंडियाने सलग २ सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्या २ सामन्यांमध्ये विश्रांती दिलेल्या वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन निश्चित आहे; मात्र युवा शुभमन गिलला विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त आले आहे. (IND vs AUS 3rd ODI)

(हेही वाचा – Coriander expensive: पावसामुळे कोथिंबीर महागली, एका जुडीसाठी मोजावे लागतात ‘एवढे’ पैसे)

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह एका सामन्याच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेसाठी उपलब्ध असणार आहे, तर अष्टपैलू अक्षर पटेलला वर्ल्डकपपूर्वी दुखापतीतून सावरण्यासाठी थोडा वेळ दिला जाईल. सलामीवीर शुभमन गिल आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांना काही दिवस विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. संघाच्या रोटेशन धोरणानुसार बुमराहला विश्रांती देण्यात आली होती आणि आता तो कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यासह संघात परतेल. काही काळ सतत खेळत असलेल्या गिलशिवाय शार्दुल ठाकूरलाही ३-४ दिवस विश्रांती देण्यात येणार आहे. (IND vs AUS 3rd ODI)

दुसऱ्या वनडेत शतक झळकावणारा सलामीवीर शुभमन गिलला विश्रांती दिली जाऊ शकते. ऋतुराज गायकवाड आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे तो तिसर्‍या वनडेचा संघाचा भाग असणार नाही. आर अश्विनच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येऊ शकतो.

भारताची संभाव्य टीम

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी (IND vs AUS 3rd ODI)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.