Ajit Pawar : काकांना मागे टाकून अजित पवारांची आगेकूच

124
Ajit Pawar : काकांना मागे टाकून अजित पवारांची आगेकूच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना काका शरद पवार यांना बाजूला सारून अजितदादा पवार यांची आगेकूच सुरूच आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झालेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. झारखंडमधील एक आणि नागालँडचे सात आमदार नुकतेच अजितदादा यांच्या गटात सामील झाले आहे.

या सर्वाना अपात्र ठरविण्याची मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने आयोगाकडे दाखल केली आहे, अशी माहिती धीरज शर्मा यांनी दिली आहे. एवढेच नव्हे तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झालेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी सुद्धा याचिकेत करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणूक आयोगाकडे याचिका प्रलंबित असताना देखील अजित पवार यांनी आघाडी घेण्याचे काम सुरु ठेवले आहे.

(हेही वाचा – Luggage Rules : विमान प्रवास करताय, या वस्तू सोबत घेऊन जाणे टाळा!)

अजित पवारांची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे, मुश्रीफ यांचा समावेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जंबो राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीत ३५ सदस्यांचा समोवश आहे. १४ सदस्य, १० स्थायी आमंत्रित आणि ११ विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) महासचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ता ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण ३५ सदस्य आहेत. यात अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. सहा महासचिवांचा समावेश करण्यात आला आहे. यात खा. सुनील तटकरे, बृजमोहन श्रीवास्तव, एस. आर. कोहली, के. के. शर्मा, वाई. पी. त्रिवेदी, सैयद जलालुद्दीन वकील आणि एन. ए. मोहम्मद कुट्टी यांचा समावेश आहे. याशिवाय, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, कमलेश कुमार सिंह, वांथुंगो ओड्यू यांचा समावेश आहे.

स्‍थायी आमंत्रित सदस्य-माजी खा. मधुकर कुकरे, रामराजे निंबाळकर, धर्म राव आत्राम, धनंजय मुंडे, रुपाली चाकणकर, संजय बनसोड, आदिती तटकरे, अनिल भैदास पाटील, राजेंद्र जैन आणि विश्वजीत चंपावत.

विशेष आमंत्रित सदस्य-सच्चिदानंद सिंह, संजय कुमार सिंह, राजेंद्र शर्मा, शिवाजीराव गरजे, प्रताप चौधरी, पी. के. नरेश, अमिया सरकार, संजय प्रजापती, ओमिलो के. संगमा, सलाम जॉय सिंह आणि नवीन कुमार सिन्हा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.