Dhanagar Reservation : गिरीश महाजन यांची शिष्टाई कामी आली…

94

अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी (Dhanagar Reservation) यशवंत सेनेने सुरू केलेले उपोषण २१व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाची मध्यस्थी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर यशवंत सेनेचे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर यांनी हा उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील – गिरीश महाजन

चौंडी येथील उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, आरक्षणाच्या (Dhanagar Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी मान्य करण्यात आली असून सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील. धनगर समाजाला आरक्षण (Dhanagar Reservation) देण्याची आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. ५० दिवसांत आरक्षणाबाबतच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येतील. यामध्ये माहिती जमवण्यासह कायदेशीर मार्गाबाबत चर्चा होणार आहे. धनगर समाजासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होती. ती देखील पूर्ण करण्यात येणार असून लवकरच योजना लागू करण्यात येतील, असा भूमिका गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.