Asian Games 2023 : घोडेसवारीत देशाला पहिलं सुवर्ण पदक जिंकून देणारे खेळाडू माहीत आहेत का?

141
Asian Games 2023 : घोडेसवारीत देशाला पहिलं सुवर्ण पदक जिंकून देणारे खेळाडू माहीत आहेत का?
Asian Games 2023 : घोडेसवारीत देशाला पहिलं सुवर्ण पदक जिंकून देणारे खेळाडू माहीत आहेत का?
  • ऋजुता लुकतुके

आशियाई खेळांचा तिसरा दिवस भारतासाठी महत्त्वाचा ठरला तो घोडेसवारीत मिळालेल्या सुवर्ण पदकामुळे. या प्रकारात देशाला मिळालेलं हे पहिलंच सुवर्ण आहे. या संघातील खेळाडूंची ओळख करून घेऊया. भारताच्या घोडेसवारी संघाने होआंगझाओ आशियाई खेळांमध्ये ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं आहे. चीनच्या संघाला त्यांनी तब्बल पाच गुणांनी मागे टाकलं. घोडेसवारी हा खेळ भारतात फारसा प्रचलित नाही. आणि फक्त उच्चमध्यमवर्गीयांपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे आधी या खेळाबद्दल त्यातील ड्रेसेज प्रकाराबद्दल आणि भारताला ऐतिहासिक सुवर्ण जिंकून देणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

ऐतिहासिक सुवर्ण जिंकणारे अनुष, ह्रिदय, सुदीप्ती आणि दिव्यकीर्ती

आशियाई खेळांत घोडेसवारीच्या ड्रेसेज प्रकारात भारताने हे ऐतिहासिक सुवर्ण मिळवलं आहे. आशियाई स्तरावर या खेळात देशाला मिळालेलं हे पहिलंच सुवर्ण. तर घोडेसवारीतही मागच्या ४१ वर्षांत भारताने फक्त दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकलं आहे. आणि अशी ही ऐतिहासिक कामगिरी करणारा भारतीय संघ आहे अनुष अगरवाला, ह्रिदय विपुल, दिव्यक्रिती आणि सुदीप्ती हजेला!

अतीजलद आणि चपळ अशा या खेळात या तरुणांनी देशाला ऐतिहासिक सुवर्ण मिळवून दिलं आहे. ड्रेसेज प्रकार हा खूप वेळ चालणारा आहे. आणि आशियातील सर्वोत्तम संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अशावेळी दहा तासांच्या चिवट झुंजीनंतर भारतीय संघाने २०९.२०५ गुणांची कमाई केली. तर या प्रकारातील बलाढ्य संघ असलेल्या चीनने २०४.८८२ गुण मिळवले.

भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल ठरला तो अनुष अगरवाल आणि त्याचा घोडा एट्रो. या दोघांनी ७१ गुणांची कमाई केली. त्या पाठोपाठ ह्रिदय विपुल आणि त्याचा घोडा एमराल्डने ६९ गुण कमावले. दिव्यक्रिती आणि तिचा घोडा फिरोदने ६८ तर सुदीप्ती आणि तिचा घोडा चिन्स्कीने ६६ गुण मिळवले.

भारतीय तरुणाईने चीनबरोबरच सुवर्ण पदकाचे दावेदार जपानच्या संघाचाही पराभव केला. घोडेसवारी हा खेळ तसा भारतात फारसा परिचित नाही. त्यामुळे घोडेसवारी आणि त्यातील ड्रेसेज प्रकाराबद्दलही जाणून घेऊया.

घोडेसवारीतील ड्रेसेज प्रकार काय आहे?

घोडेसवारी हा वैयक्तिक तसंच सांघिक क्रीडाप्रकार आहे. यातील ड्रेसेज प्रकारात घोडेसवारांना घोड्यांकडून तीन विशिष्ट प्रकारच्या उड्या मारुन घ्यायच्या असतात. २० बाय ६० मीटरच्या आखलेल्या मैदानात बारा खुणा केलेल्या असतात. आणि या खुणांच्या जागी घोड्यांनी आपली उडी बदलायची असते. शिवाय या उड्यांबरोबरच तिचा वेगही बदलायचा असतो.

उड्यांचा प्रकार आणि वेग यांच्यातले बदल जितके स्वाभाविक आणि सहज होतील, तितके जास्त गुण घोडेस्वारांना मिळतात. घोड्यांनी या खुणा ओळखून त्या प्रमाणे आपली उडी बदलणं आणि ते करताना आवश्यक वेग राखण्याचं कौशल्य खेळाडूंनी दाखवणं असा हा आव्हानात्मक प्रकार आहे. तीन प्रकारच्या उड्यांना वॉक (साधं चालणं), ट्रॉट (घोड्यांचा मंद स्कॉट) आणि कँटर (उंच अडथळा पार करणारी उडी) असं म्हणतात.

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिक दरम्यानचा वैयक्तिक ड्रेसेज प्रकारातील व्हीडिओ तुम्ही इथं पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=87-Q6GtBrm8

भारतीय सुवर्ण विजेत्यांची ओळख

ड्रेसेजच्या सांघिक प्रकारात भारताला मिळालेलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. यापूर्वी १८८६ च्या आशियाई खेळांमध्ये भारताला कांस्य पदक मिळालं होतं. तर घोडेसवारीतील भारताचं एकमेव सुवर्ण आहे ते नवी दिल्लीत १९८२ मध्ये झालेल्या आशियाई खेळात मिळालेलं वैयक्तिक सुवर्ण.

ड्रेसेज प्रकारातील सुवर्ण जिंकलेल्या खेळाडूंची ओळख करून घेऊया.

सुदीप्ती हलेजा ही सगळ्यात तरुण म्हणजे २१ वर्षांची आहे.

सुदीप्ती हलेजा

वय – २१

जन्म – इंदूर, मध्यप्रदेश

प्रशिक्षण – पँफो, फ्रान्स

अगदी वयाच्या सहाव्या वर्षी तिने घोडेसवारीला सुरुवात केली. उन्हाळ्याच्या सुटीतील छंद म्हणून झालेली सुरुवात तिला व्यावसायिक कारकीर्द घडवण्यासाठी उपयोगी पडली. तिचे आताचे प्रशिक्षक कॅमिली ज्युडेट या फ्रेंच राष्ट्रीय संघाकडून खेळलेल्या आहेत.

दिव्यक्रिती सिंग

वय – २३

जन्म – जयपूर, राजस्थान

प्रशिक्षण – हेगन, जर्मनी

दिव्यक्रितीच्या शाळेत सातवीपासून एक तरी खेळ निवडणं आणि तो खेळणं अनिवार्य होतं. रजपूत घरातील क्रितीने घोडेसवारी निवडला. आणि तिथूनच तिच्या खेळाची खरी सुरुवात झाली. कारण, शालेय वयातच दिव्यक्रिती नेदरलँड, जर्मनी, बेल्जिअम आणि ऑस्ट्रिया अशा ठिकाणी प्रशिक्षणासाठी जात होती. तसंच तिने ड्रेसेज प्रकारातील सर्वोत्तम सुविधा असलेल्या फ्लोरिडातील वेलिंग्टन या ठिकाणीही काही काळ प्रशिक्षण घेतलं आहे. २०२० पासून व्यावसायिकरीत्या घोडेसवारी करता यावी यासाठी तिने भारतातून बाहेर पडून जर्मनीचा आसरा घेतला आहे.

(हेही वाचा – JP Nadda : जे पी नड्डा आरती करत असताना साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग)

ह्रिदय छेडा

वय – २५

जन्म – मुंबई

प्रशिक्षण – फ्रान्स

सहाव्या वर्षी ह्रिदयने मुंबईतच घोडसवारीला सुरुवात केली. आणि त्यानंतर प्रशिक्षणासाठी तो काही काळ युरोपला राहिला आहे. लंडन विद्यापीठातून त्याने व्यवस्थापन शास्त्रात स्नातक अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अभ्यासातही ह्रिदय हुशार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्यावसायिक प्रगतीबरोबरच भारतातील मुलांना या खेळाची गोडी लागावी यासाठी ह्रिदय मुंबई, पुणे आणि पाँडेचेरी इथं नियमितपणे घोडेसवारीची प्रात्यक्षिकं घेतो. आणि घोड्यांना घोडेसवारीसाठी तयार करण्याचं कामही करतो.

अनुष अगरवाला

वय – २३

जन्म – कोलकाता, पश्चिम बंगाल

प्रशिक्षण – बोर्शेन, जर्मनी

अनुष ३ वर्षांचा असताना तो पहिल्यांदा घोड्यावर बसला. आणि त्यानंतर दर आठवड्याला तो घोडेसवारीचा आनंद घ्यायचा. पण, तीन वर्षांनंतर म्हणजे सहाव्या वर्षी त्याच्या आईने त्याला हा खेळ शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सोळाव्या वर्षापर्यंत अनुष नवी दिल्लीत शिकत होता. पण, पुढे उच्चशिक्षणासाठी तो जर्मनीला गेला. आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुषने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=MrQj6g7b_C4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.