रत्नागिरीत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी समाजप्रबोधनाचे उत्तुंग कार्य केले. जातीपातीचा भेद दूर करून समाजऐक्य साधण्यासाठी वीर सावरकर यांनी स्पृश्य-अस्पृश्य यांचे सहभोजन घडवले. या संकल्पनेचे स्मरण म्हणून ‘वसईचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Ganeshotsav 2023) यंदाच्या वर्षी सहभोजनाचा उपक्रम राबवत आहे.
या मंडळाचे पदाधिकारी राहुल भांडारकर म्हणाले की, अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मंडळाकडून सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी गणेशभक्तांनी शिधा दिला असून तो श्री गणेशाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. १० हजार जणांच्या सहभोजनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.
(हेही वाचा Ruia College : आई-वडिलांची सेवा करण्याची शिकवण देणारा रुईया महाविद्यालयाचा ‘विद्यार्थ्यांचा राजा’)
यासोबतच या मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीसाठी मंडळाकडून दर ३ महिन्यांनी रक्तदान शिबिर घेतले जाते.
गणपतीला मोदक आवडतात, मोदक बनवण्याची प्रक्रिया सांघिक आहे, वर्षानुवर्षे लोक तत्त्वे आणि मूल्ये गमावत आहेत, या मूल्यांचे जतन आणि संवर्धनासाठी वर्षानुवर्षे मोदक बनवण्याची स्पर्धा घेतली जाते. या वर्षीही या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
Join Our WhatsApp Community