Asian Games 2023 : २७ सप्टेंबरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घ्या 

बुधवारी २७ सप्टेंबरला भारतीय संघाला नेमबाजीत पदकाने सुरुवात करण्याची संधी आहे. शिवाय मुष्टीयुद्ध आणि हॉकीचेही महत्त्वाचे सामने आहेत. भारतीय संघाचं वेळापत्रक समजून घेऊया

175
Asian Games 2023 : २७ सप्टेंबरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घ्या 
Asian Games 2023 : २७ सप्टेंबरचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घ्या 

ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला घोडेसवारीत सुवर्ण पदक मिळाल्यामुळे संघाचे हौसले सध्या बुलंद आहेत. ह्रिदय छेडा, अनुष अगरवाला, दिव्यक्रिती सिंग व सुदिप्ती या चौघा खेळाडूंनी ड्रेसेज प्रकारात भारतीय संघाला पहिलं आशियाई (Asian Games 2023) सुवर्ण जिंकून दिलं. भारतीय संघाने तीन सुवर्णांसह आता पदक तालिकेतही पाचवं स्थान पटकावलं आहे.

आता २७ सप्टेंबरला स्पर्धेच्या चौथ्या दिवशी नेमबाजीत पदकाची संधी आहे. बुधवारचं भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घेऊया… (Asian Games 2023)

घोडेसवारी 

सकाळी ५ वाजून ३० मिनिटं – ह्रिदय छेडा, अनुष अगरवाला, दिव्यक्रिती सिंग आणि सुदीप्ती हजेला – ड्रेसेज प्रकारातील वैयक्तिक बाद फेरी

नेमबाजी 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – अंगद वीर सिंग बाजवा, गुरज्योत सिंग खांगुरा, अनंत जीत सिंग नकुरा – स्कीट प्रकारात वैयक्तिक पात्रता फेरी
अंगद वीर सिंग बाजवा, गुरज्योत सिंग खांगुरा, अनंत जीत सिंग नकुरा – स्कीट प्रकारात सांघिक स्पर्धा
अशी चोक्सी, मानिनी कौशिक, सिफ्त कौर सामरा – ५० मीटर रायफल थ्री पोझिशन – महिलांची पात्रता फेरी
अशी चोक्सी, मानिनी कौशिक, सिफ्त कौर सामरा – ५० मीटर रायफल थ्री पोझिशन – महिलांची सांघिक स्पर्धा
परिनाझ धरिवाल, दर्शना राठोड, गनेमत शेखॉन – स्कीट प्रकारात महिला सांघिक स्पर्धा
परिनाझ धरिवाल, दर्शना राठोड, गनेमत शेखॉन – स्कीट प्रकारात महिला वैयक्तिक पात्रता स्पर्धा
रिधम सांगवान, ईशा सिंग, मनू भाकेर – २५ मीटर रॅपिड पिस्तुल पात्रता फेरी
रिधम सांगवान, ईशा सिंग, मनू भाकेर – २५ मीटर रॅपिड पिस्तुल सांघिक फेरी

तायक्वांडो 

सकाळी ६ वाजून ३० मिनिट – मार्गारेट मारिया रेगी वि. ज्यू एन चँग (चायनीज तैपई) – महिला ६७ किलो क्यूरोगी अंतिम १६ जणांची फेरी
शिवांशी त्यागी वि. व्हीए मिथोना (कंबोडिया) – पुरुषांची ८० किलो वजनी गटातील क्यूरोगी अंतिम ३२ जणांची फेरी

तलवारबाजी 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – अर्जुन देव, बिबिश, आकाश – पुरुषांचा फॉइल संघ – बाद फेरी
सकाळी १० वाजून १५ मिनिटं – ईना अरोरा, ज्योतिका दत्ता, यशकिरत कौर, तनिक्षा खत्री – महिलांची एपी सांघिक बाद फेरी

वुशू 

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – रोहीत जाधव – पुरुषांची दाओशू अंतिम फेरी
दुपारी १२ वाजता – रोहीत जाधव – पुरुषांची गुंनशू अंतिम फेरी
संध्याकाळी ५ वाजता – रिशिबिना देवी वि. नियेन (व्हिएतनाम) – उपान्त्य फेरी

ब्रिज

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – जॅगी शिवदासानी, संदीप ठकराल, राजेश्वरी तिवारी, सुमित मुखर्जी, राजू तोलानी, अजय खरे – पुरुषांची पात्रता स्पर्धेतील साखळी फेरी
आशा शर्मा, पूजा बात्रा, भारती डे, अलका क्षीरसागर, कल्पना गुर्जर, विद्या पटेल – महिलांची पात्रता स्पर्घा, साखळी फेरी
किरण नादर, बी सत्यनारायण, हिमानी खंडेलवाल, राजीव खंडेलवाल, मरियन करमरकर, संदीप करमरकर – मिश्र सांघिक पात्रता फेरी

जलतरण 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – निना वेंकटेश – महिलांची १०० मीटर बटरफ्लाय (हिट २)
सकाळी ७ वाजून ५८ मिनिटं – माना पटेल – महिलांची १०० मीटर बॅकस्ट्रोक (हिट २)
सकाळी ८ वाजून १२ मिनिटं – श्रीहरी नटराज व टीजी मॅथ्यू – पुरुषांची २०० मीटर फ्रीस्टाईल (हिट ३)
सकाळी ८ वाजून ३४ मिनिटं – लिनेशा – महिलांची १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (हिट १)

स्कॉश 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – भारत वि. कुवेत – पुरुषांचा पूल ए मधील साखळी सामना
भारत वि. नेपाळ – महिलांचा पूल बी मधील साखळी सामना
दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – भारत वि. पाकिस्तान पुरुषांचा पूल ए मधील साखळी सामना
दुपारी २ वाजता – भारत वि. मकाऊ – महिलांचा पूल बी मधील साखळी सामना

सायकलिंग ट्रॅक 

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – रोनाल्डो सिंग व डेव्हिड बेकम – पुरुषांची वैयक्तिक स्प्रिंट पात्रता फेरी
सकाळी ७ वाजून ५६ मिनिटं – शशिकला आगाशे व त्रियांशा पॉल – महिला केरिन पहिली फेरी
सकाळी ८ वाजून ३८ मिनिटं – शशिकला आगाशे व त्रियांशा पॉल – महिला केरिन रेपिजाज फेरी
सकाळी ८ वाजून ५० मिनिटं – रोनाल्डो सिंग व डेव्हिड बेकम – वैयक्तिक रेपिचाज

सेलिंग 

सकाळी ८ वाजून ३० मिनिटं – जेरोम कुमार – iQFoil – अंतिम फेरी
विष्णू सर्वानन – ILCA७ – अंतिम फेरी
नेत्रा कुमानन – ILCA६ – अंतिम फेरी
सकाळी ९ वाजून ३० मिनिटं – चित्रेश ताथा – काईटबोर्डिंग अंतिम फेरी

हॉकी 

सकाळी १० वाजून १५ मिनिटं – भारत वि. सिंगापूर – महिलांची पूल ए मधील साखळी फेरी

(हेही वाचा-Curd : शुभ कार्याआधी दही साखर खाण्यामागील काय आहे वैज्ञानिक कारण?)

ईस्पोर्ट्स 

सकाळी ११ वाजून ३० मिनिटं – व्हिएतनाम वि. भारत – लीग ऑफ लिजंड्स

बास्केटबॉल 

दुपारी १२ वाजून १० मिनिटं – ३x३ बास्केटबॉल मकाऊ वि. भारत पूल सी मधील साखळी फेरी
दुपारी ४ वाजून ५५ मिनिटं – भारत वि. चीन – महिलांचा पूल ए मधील साखळी सामना
संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटं – भारत वि. इंडोनेशिया महिलांची ए गटातील प्राथमिक फेरी

बुद्धिबळ 

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – कोनेरू हम्पी व द्रोनवल्ली हरिका – महिलांची वैयक्तिक आठवी फेरी
विदिथ गुजराथी व अर्जुन कुमार – वैयक्तिक आठवी फेरी
दुपारी २ वाजून ३० मिनिटं – कोनेरू हम्पी व द्रोनवल्ली हरिका – महिलांची वैयक्तिक नववी फेरी
विदिथ गुजराथी व अर्जुन कुमार – वैयक्तिक नववी फेरी

लॉन टेनिस 

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – सुमित नागल वि. शिझेन झँग (चीन) – पुरुषांची वैयक्तिक उपउपान्त्य फेरी
अंकिता रैना वि. हरुका काजी (जपान) – महिलांची एकेरी वैयक्तिक उपउपान्त्य फेरी
दुपारी ३ वाजून ३० मिनिटं – रामकुमार रामनाथन व साकेत मानेनी वि. यिबिंग वू व शिंझेन झँग (चीन) – पुरुषांच्या दुहेरीतील उपउपान्त्य फेरी
युकी भांबरी व अंतिका रैना वि. फ्रान्सिस अलकांतरा व ॲलेक्स ईला (फिलिपीन्स) मिश्र दुहेरीची अंतिम १६ जणांची फेरी
रोहन बोपाना व ऋतुजा भोसले वि. शिनजी हझावा व अयानो शिमिझू मिश्र दुहेरीची अंतिम १६ जणांची फेरी

मुष्टीयुद्ध 

दुपारी १ वाजून १५ मिनिटं – शिव थापा वि. कुलतेव असकत (किरगिझस्तान) – पुरुषांची ५७ ते ६३ किलो वजनी गटातील प्राथमिक फेरी दुपारी १ वाजून ३० मिनिटं – संजीत वि. लझिबेक मुलोयोनोव (उझबेकिस्तान) – पुरुषांची ८० ते ९२ किलो वजनी गटातील प्राथमिक फेरी
संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटं – निखत झरीन वि. सी बाक (द कोरिया) – ५० किलो वजनी गटातील महिलांचा अंतिम १६ जणांचा सामना

टेबल टेनिस 

दुपारी १ वाजून ३० मिनिटं – मनुष शाह/मानव ठक्कर वि. सितिसक नुकचार्त/नापात थानमाथिकोम (थायलंड) – पुरुषांच्या दुहेरीतील अंतिम ६४ जणांचा फेरी
दुपारी ३ वाजून ५० मिनिटं – सथियन गुणशेकरन व मनिका बात्रा वि. नापत थानमाथिकोम व सुथासिनी सवेताबुत (थायलंड) – मिश्र दुहेरीची अंतिम ३२ जणांची फेरी
दुपारी ४ वाजून २५ मिनिटं – हरमित देसाई व श्रीजा अकुला वि. चि चेंग व ह्यू ली सिक (मकाऊ) – मिश्र दुहेरीतील अंतिम ३२ जणांची फेरी

हँडबॉल 

दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – भारत वि. हाँग काँग महिलांची बी गटातील प्राथमिक फेरी

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.