Monsoon Update : मुंबई पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता , राज्यभरातही इतर जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाला आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर ढगाची दाटी झालेली आहे.

210
Monsoon Update : मुंबई पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता , राज्यभरातही इतर जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
Monsoon Update : मुंबई पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता , राज्यभरातही इतर जिल्ह्यांना हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

पुणे, मुंबईसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा सतर्कतेचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.पुढील दोन दिवस विदर्भ वगळता राज्याच्या उर्वरित भागांत हलक्या तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Monsoon Update)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भापासून दक्षिण कोकणापर्यंत कमी दाबाची रेषा तयार झाली आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर ढगाची दाटी झालेली आहे. बुधवार(२७ सप्टेंबर) आणि गुरुवारी (२८ सप्टेंबर) ढगांची दाटी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवेत आर्द्रता आहे आणि तापमानही सरासरी ३० अंश सेल्सिअसच्या घरात आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर माळशेज घाट आणि खंडाळा घाटातून प्रवास करणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (Monsoon Update)

(हेही वाचा : Ind vs Aus ODI Series : भारताला खुणावतोय ‘हा’ विक्रम)

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी हवामान खात्याकडून मुंबई-पुण्याला यलो अलर्ट दिला होता. त्यानंतर सायंकाळी नवी मुंबई, नाशिक, पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यातच पुण्यात अचानक झालेल्या पावसामुळे गणेशभक्तांची एकच धावाधाव पाहायला मिळाली.विदर्भ वगळता मंगळवारी राज्यभरात हलक्या सरींची नोंद झाली. दिवसभरात विदर्भात अकोल्यात ११ मिमी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर १७, नाशिक २०, सांगली २५, सातारा ४५ आणि सोलापुरात १७ मिमी पावसाची नोंद झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.