इंटरनेट सर्च इंजिन म्हणून, Google हे आज जगातील सर्वात मोठे व्यासपीठ आहे. जगभरातील लाखो वापरकर्ते दररोज हे शोध इंजिन वापरतात. २७ सप्टेंबर रोजी Google आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे (Google 25th Birthday) . दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कंपनी वाढदिवसानिमित्त आपले डूडल अपडेटकेले आहे. Google ने फक्त एक संशोधन प्रकल्प (search Engine ) म्हणून सुरुवात केली असली तरी लोकांची दैनंदिन गरज झाली आहे. आणि त्याचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला आहे याचे आपण सर्व साक्षीदार आहोतच. याच गुगल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
असा झाला गुगलचा जन्म
कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे दोन विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी सप्टेंबर १९९८ मध्ये गुगलचा शोध लावला. या दोघांनी Google.stanford.edu या पत्त्यावर इंटरनेट सर्च इंजिन तयार केले होते. अधिकृतरीत्या लॉन्च करण्यापूर्वी यांनी त्याचे नाव बॅकरब ठेवले, जे नंतर Google मध्ये बदलले गेले.
गुगल चे नाव गुगल हे कसे पडले
Google चे नाव गणितीय संज्ञा “googol” वरून ठेवण्यात आले, जे १०० शून्यांनंतर क्रमांक १ चा संदर्भ देते. “Google” हे नाव गुगोलच्या गणिती संकल्पनेने प्रेरित झाले आहे, जे त्यांना सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने असलेल्या प्रचंड माहितीचे प्रतीक आहे. “गुगल” चे स्पेलिंग खरेतर चूक होते, परंतु त्यांना नवीन नाव आवडले आणि ते स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. (Google 25th Birthday)
गुगलचा इतिहास
जर तुम्ही आजपासून १५-२० वर्षांपूर्वीचा विचार केला तर त्यावेळी इंटरनेटचा शोध तर लागलेला होता परंतु इंटरनेट वर पुरेशी ज्ञान व माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे लोकांना सहज माहिती मिळवणे म्हणजे फार कठीण काम होते.जसे आपण आज गूगल च्या मदतीने कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. पण त्याकाळी इंटरनेट वर पुरेशी माहिती नव्हती. इंटरनेट वर थोड्या फार वेबसाइट्स होत्या पण त्यावर देखील आवश्यक आणि हवी ती माहिती मिळत नसे. त्यामुळे त्या काळच्या लोकांचा माहिती व ज्ञान मिळवण्याचा एकमेव स्रोत होता तो म्हणजे पुस्तके किंवा मग एखाद्या वरिष्ठ जाणकार व्यक्ती कढून माहिती मिळवणे, परंतु हे फार अवघड काम होते. या समस्येचा निराकरण केलं लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन Google सर्च इंजिन निर्माण करून, त्यामुळे इंटरनेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास होत गेला आणि लोकांना ही आवश्यक ती माहिती मिळू लागली.
अनेकवेळा बदलल्या वाढदिवसाच्या तारखा
गुगलचा वाढदिवस यापूर्वी वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जात होता. आधी ७ सप्टेंबरला वाढदिवस, मग गुगलचा वर्धापन दिन ८ आणि नंतर २६ सप्टेंबरला साजरा झाला. त्यानंतर कंपनीने २७ सप्टेंबरला गुगलचा वाढदिवस अधिकृतपणे साजरा करण्याची घोषणा केली कारण या दिवशी गुगलने आपल्या सर्च इंजिनवर पेज सर्च नंबरचा नवा रेकॉर्ड बनवला होता. म्हणजे १,२,३,४ इ. जे आपण Google पृष्ठाच्या तळाशी पाहतो.
गुगलचे १०० पेक्षा जास्त प्रोजेक्ट
गूगल हे आज जगामध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. हे एक केवळ सर्च इंजिन च नसून तर गूगल आज १०० पेक्षा ही जास्त प्रोजेक्ट्स वरती काम करत आहे. Google chrome, google playstore, google drive, google toolbar, gmail, इत्यादी हे काही गूगलचे यशस्वी आणि लोकपरीचित प्रोजेक्ट्स आहेत. Google आणखी खूप साऱ्या प्रोजेक्ट्स वरती काम करत आहे.
प्रत्येक गोष्टीचे फायदे व तोटे असतात त्याचप्रमाणे गुगलचेही तसेच काहीसे आहे. तर जाणुन घेऊयात काय आहेत ते
हे आहेत फायदे
गुगल सर्च इंजिन – कुठल्याही गोष्टीची माहिती देऊ शकते. काहीही सर्च करा.
यूट्यूब – गुगल सर्च इंजिन प्रमाणेच इथे तुम्हाला खूप माहिती मिळेल व्हिडिओ स्वरूपात
गुगल मॅप – पूर्वी रस्त्यात जाणाऱ्या लोकांना तसेच दुकानदाराला रस्ता विचारावा लागायचा, भर जंगलात, सामसूम रस्त्यावर कोणी नसलं तर पंचाईत व्हायची, आता मॅप वापरा, अगदी अचूक माहिती मिळते, कुठे जायचं, कसं जायचं, आजूबाजूला काय, किती वेळ लागेल.
जी मेल – ऑनलाईन पत्रव्यवहार. मेसेज पाठवणे
गुगल म्युझिक आणि व्हिडिओ प्लेअर – गाणे, व्हिडिओ बघा.
गुगल पे – ऑनलाईन पैसे पाठवा, मिळवा,
डिजिटल वेलबिंग – तुम्ही किती वेळ टाईमपास केला मोबाईल, वर, काय आणि कोणते अॅपलिकेशन पाहिले.
गुगल जाहिराती – तुम्ही आणि गुगल दोघे यातून पैसे कमावू शकतात.
प्ले स्टोअर – इतर कोणतेही ऍप वापरा
(हेही वाचा : Tennis Hall of Fame : लिअँडर पेसचं मानाच्या टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन )
हे आहेत तोटे
- माणसाला आळशी बनवलय
- सगळंच ऑनलाईन बघायची सवय होते आहे, त्यामुळे हळू हळू माणसं प्रश्न माणसानं विचारणा ऐवजी गुगल ला विचारतं, त्यामुळे संवाद थोडा कमी होत चाललाय
- आपण जी माहिती टाकतो गुगल वर, ती सार्वजनिक होण्याची दाट शक्यता.
- मोबाईल च व्यसन लागण्याची दाट शक्यता.
- भावनिक मुद्द्यांना अजुन इतकी साद घालू शकत नाही.
हेही पहा –