Mathura Train Accident: ट्रेन ट्रॅक सोडून थेट चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात

जंक्शनवर ट्रेन थांबली, त्यानंतर सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले, मात्र त्यानंतर ट्रेन अचानक रुळ सोडून प्लॅटफॉर्मवर कशी चढली याचा शोध घेतला जात आहे.

160
Mathura Train Accident: ट्रेन ट्रॅक सोडून थेट चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात
Mathura Train Accident: ट्रेन ट्रॅक सोडून थेट चढली प्लॅटफॉर्मवर, मथुरामध्ये भीषण ट्रेन अपघात

उत्तरप्रदेशातील मथुरेमध्ये शकूर बस्ती येथून येणाऱ्या ईएमयू ट्रेनला मथुरा जंक्शनवर अपघात झाला.(Mathura Train Accident) ही ट्रेन अचानक रूळ सोडून प्लॅटफॉर्मवर चढली. सुदैवाची बाब म्हणजे, हा अपघात झाला तेव्हा ट्रेनमध्ये प्रवासी उपस्थित नसल्यामुळे मोठी जीवीतहानी टळली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला, लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. काही काळासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भितीचं वारावरण निर्माण झालं होतं. मंगळवारी रात्री १०: ४९ ला ट्रेन आली. त्यावेळी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. ट्रेन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचं काम सुरूअसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (Mathura Train Accident)

उत्तर प्रदेशातील मथुरा जंक्शनवर रात्री उशिरा रेल्वे अपघात झाला. शकूर बस्तीकडून येणारी एक ईएमयू (EMU) गाडी थेट मथुरा रेल्वे स्थानकाच्या फलाटावर चढली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही . मथुरा स्टेशनचे संचालक एसके श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवासी आधीच ट्रेनमधून उतरले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

(हेही वाचा : Google 25th Birthday : गुगलचा आज २५ वा वाढदिवस,जाणून घ्या तो कसा बनला इंटरनेट विश्वाचा राजा)

ही गाडी शकूर बस्ती येथून आली असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन हटवल्यानंतर अप मार्गावरील गाड्या पुन्हा सुरू केल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जंक्शनवर ट्रेन थांबली, त्यानंतर सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले, मात्र त्यानंतर ट्रेन अचानक रुळ सोडून प्लॅटफॉर्मवर कशी चढली याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म आणि वरील शेडचं नुकसान झालं आहे. काही वाहनांनाही याचा फटका बसला आहे.

हेही पहा : 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.