Asian Games 2023 : नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक

आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात १८ पदकाची भर पडली आहे.

142
Asian Games 2023 : नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक
Asian Games 2023 : नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक

आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात १८ पदकांची भर पडली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात ५सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक अशी एकूण १८ पदकं आली आहेत.(Asian Games 2023 )

सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग आणि तिसऱ्या स्थानी आशी चौकसी ४३७.८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.१७५४ गुणांसह, भारताने स्पर्धेत रौप्य पदक मिळवले, जे सुवर्णपदकापेक्षा फक्त १९गुणांनी कमी होते.१०मीटर एअर रायफल गटात विश्वविक्रमी सुवर्णपदक पटकावले होते.भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं ५० मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. याच इव्हेंटमध्ये चीननं दुसऱ्या क्रमांकावर राहून रौप्यपदक आपल्या नावे केलं. तर भारताच्या आशी चौक्सीनं ५० मीटर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.(Asian Games 2023 )
(हेही वाचा : Kapil Dev Viral Video : कपिल देव यांचा हातात बेड्या पडलेला व्हायरल व्हीडिओ आणि गौतम गंभीरचं स्पष्टीकरण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.