NIA Raid : खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ५ राज्यांमध्ये एनआयएचे छापे

राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA Raid) हाती खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स संबंधात सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. एनआयएकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

189
NIA Raid : खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ५ राज्यांमध्ये एनआयएचे छापे
NIA Raid : खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या विरोधात ५ राज्यांमध्ये एनआयएचे छापे

खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या विरोधात मोठी कारवाई एनआयएने करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने यूपी-दिल्लीसह ५ राज्यांमध्ये ५० हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे (NIA Raid). गेल्या काही महिन्यांमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळांले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA Raid) हाती खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्स संबंधात सुत्रांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. एनआयएकडून त्या दृष्टीने तपास सुरु आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA Raid) देशभरात खलिस्तानी-गँगस्टर्सविरोधातील कारवाई वेगवाग केली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब तसेच राजस्थान या भागात छापेमारी सुरु आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्स लूपन बसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये अनेक कुख्यात गुंडांनी आश्रय घेतला असून त्यांचा संबंध खलिस्तानी दहशतवाद्यांशी असल्याचं सांगितलं जात आहे.. खलिस्तानी दहशतवादी विविध कारवायांसाठी गँगस्टर्सची मदत घेत असल्याची माहिती राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागली आहे. खलिस्तानी गँगस्टर्सकडून पैसे देऊन कारवाया करत आहेत. यासाठी खलिस्तानींना पैशांची गरज आहे. हा निधी पाकिस्तानातून अंमली पदार्थ तस्करी करून मिळवला जात, असल्याची माहिती आहे.

(हेही वाचा : Judges Appointments : ७० न्यायाधीश नियुक्त्या केंद्राच्या पातळीवर रखडल्याबद्दल न्यायालयाची नाराजी)

खलिस्तानी-गँगस्टर्सचा पाकिस्तानशीही संबंध
धक्कादायक बाब म्हणजे खलिस्तानी-गँगस्टर्संना भारताच्या शेजारील देश आणि शत्रू पाकिस्तान खतपाणी घालत असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. खलिस्तानी-गँगस्टर्सचा पाकिस्तानशी संबंधाचे पुरावे सापडले आहे. पाकिस्तान खलिस्तानी-गँगस्टर्संना फंडींग करत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासोबतच दहशतवादीही भारतात पाठवत आहे. या कामासाठी इस्लामी दहशतवाद्यांऐवजी खलिस्तानी दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. कॅनडात बसलेले खलिस्तानी दहशतवादी आयएसआयच्या सतत संपर्कात असल्याची माहिती आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.