Rahul Shewale : शिवसेनेच्या ‘त्या’ खासदारांवर कारवाई करणार; गटनेते राहुल शेवाळे यांचा इशारा 

महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असे राहुल शेवाळे म्हणाले

125
Rahul Shewale : राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका; खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा
Rahul Shewale : राजकारणासाठी धारावीचा विकास रोखू नका; खासदार शेवाळे यांचा विरोधकांना इशारा
नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहुल (Rahul Shewale) शिवसेनेचा व्हीप डावलणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला समर्थन करणाऱ्या विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव या चार खासदारांचे निलंबन करण्याबाबतही कायदेशीर सल्ला घेत असून, याबाबत लोकसभा अध्यक्षांना देखील निवेदन देणार असल्याचे शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्ट केले.
‘बाळासाहेब ठाकरे भवन’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसप्रणीत आघाडीतील सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या आघाडीतील अनेक खासदार या विधेयकाच्या मतदाना दरम्यान अनुपस्थित होते. लोकसभेत शिवसेना पक्षाचे प्रतोद पद खासदार भावना गवळी यांच्याकडे असून त्यांनी जारी केलेला व्हीप शिवसेनेच्या सर्व खासदारांना बंधनकारक आहे.

(हेही वाचा-Ajit Pawar : अजित पवारांना कोणी डिवचले ?)

18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित केलेल्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार गवळी यांनी पक्षाच्या वतीने सर्व खासदारांना व्हीप जारी केला होता. मात्र उबाठा गटाला समर्थन करणाऱ्या चार खासदारांनी या व्हीपचे उल्लंघन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच महिला आरक्षणाच्या समर्थनाची भूमिका घेतली होती. पण त्यांच्या  विचारांचा वारसा सांगणारे हे चार खासदार महिला आरक्षण विधेयका विषयी मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित नव्हते, ही लाजिरवाणी आणि दुर्दैवी घटना आहे.
यापैकी खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार हे तर दिल्लीमध्ये असूनही ते सभागृहात आले नाहीत. महिलांचा अवमान करणाऱ्या या खासदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल, असेही शेवाळे (Rahul Shewale) म्हणाले.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=8pL6Pvam8q4

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.