Sudhir Mungantiwar : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणाला आता लगाम

126
Sudhir Mungantiwar : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणाला आता लगाम
Sudhir Mungantiwar : कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणाला आता लगाम

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनाच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करा. त्यातून जनजागृती करा. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्या, असे निर्देश बुधवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश कदम, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाळ रेड्डी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक एस. व्ही. रामाराव, यांच्यासह प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या राज्यात एकूण २० प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवाय, गोराई, दहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करा. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईल, याबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्था, चेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्यपालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; ‘या’ दिवशी लागणार निकाल)

अद्यावत उपग्रह नकाशे
  • दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजूरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी, कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआरसॅक यंत्रणेकडून अद्यावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावी, बहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
  • केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.