ISRO Shukrayaan : इस्त्रो आता ‘शुक्रयान’ मोहिमेसाठी सज्ज; शुक्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मोहीम

सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी शुक्राचा अभ्यास

118
ISRO Shukrayaan : इस्त्रोची आता 'शुक्रयान' मोहिमेसाठी सज्ज; शुक्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मोहीम
ISRO Shukrayaan : इस्त्रोची आता 'शुक्रयान' मोहिमेसाठी सज्ज; शुक्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी नवीन मोहीम

चंद्रयान-३ (Chandrayaan-3) आणि आदित्य एल -१ (Aditya L-1) या मोहिमेनंतर आता भारताचं लक्ष्य शुक्र ग्रहावर आहे. मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिमेच्या यशानंतर आता इस्त्रो एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झाली आहे.

इस्त्रोकडून शुक्रयान (ISRO Shukrayaan) मोहिमेच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. शुक्र ग्रहावरील वातावरण आणि त्यांच्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

(हेही वाचा – NCP : समीर भुजबळांकडे मुंबईची जबाबदारी देण्यास राष्ट्रवादीतूनच विरोध)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख सोमनाथ यांनी शुक्रयान मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. शुक्र ग्रहावरील वातावरणाबाबत संशोधनासाठी इस्त्रो एक मोहीम राबवणार आहे. शुक्र ग्रहाचं वातावरण आणि तेथील आम्लीय वायूबाबत समजून घेण्यासाठी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. शुक्र आणि मंगळ ग्रहावर जीवन का नाही, या ग्रहांबाबत मुळापासून समजून घेण्यासाठी तिथे मोहीम पाठवणं आवश्यक आहे. इस्त्रो प्रमुखांच्या या वक्तव्याच्या काही महिन्यांपूर्वी इस्त्रोच्या एका शास्त्रज्ञाने शुक्रयान मोहिमेला विलंब होऊ शकतो, असा दावा केली होता. इस्त्रोकडून शुक्रयान मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे, मात्र शासनाकडून शुक्रयान मोहिमेसाठी अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती राष्ट्रीय विज्ञान अकादमी (National Science Academy)मध्ये इस्त्रो प्रमुखांनी शुक्रयान मिशनबाबत दिली.

शुक्राचा अभ्यास करणं का आवश्यक…
शुक्र ग्रहाभोवती ढगांचा थर जमा झाला आहे. त्यामध्ये आम्ल भरलेलं असतं. त्यामुळे कोणतेही अंतराळयान किंवा वाहन आम्लीय ढगांचे वातावरण ओलांडून शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पोहोचू शकत नाही. सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दल माहिती मिळवण्यासाठी शुक्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.