मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही भाजपकडून काही केंद्रीय नेत्यांना विधानसभेच्या मैदानात उतरविले जाणार आहे.येत्या दोन दिवसांतच भाजप (BJP) राजस्थानातील विधानसभा निवडणुकीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. या यादीमध्ये काही खासदारांच्या नावाचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
या खासदारामध्ये राजसमंधच्या खासदार दिया कुमारी, सवाई माधवपूर चे खासदार सुखबीर सिहं जोनपुरिया आणि राज्यसभेचे खासदार किरोडीमल मीणा यांच्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवाराच्या अंतिम नावावर चर्चा झाली असून पंतप्रधान मोदी आणि भाजप (BJP) अध्यक्ष नड्डा यांनी चर्चा करून अंतिम यादी तयार केली असल्याचे कळत आहे. नोव्हेंबर महिन्यात राजस्थानसह पाच राज्यांतील निवडणुका होत आहेत. या पाचही राज्यात थेट लढाई भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर सत्ता अबाधित राखण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. मात्र, भाजपने (BJP) इथे शक्ती पणाला लावली आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह राज्यवर्धनसिंह राठोड आणि दिया कुमारी यांना निवडणुकीत उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने राजस्थान जिंकण्यासाठी सर्व शक्य पर्यायांची चाचपणी केली आहे. भाजपकडून राजस्थानातील उमेदवाराची यादी अंतिम करून केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे. या निवडणुकीत काही नवीन चेहरे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी भाजपने चालवली आहे. काही केंद्रीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले जाणार आहे. त्यानुसार काही जागा त्यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची समजते.
Join Our WhatsApp Community