Health Tips : रोज मूठभर चणे आणि गूळ खा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे गूळ आणि चणे खाल्ल्याने मिळतात

174
Health Tips : रोज मूठभर चणे आणि गूळ खा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे
Health Tips : रोज मूठभर चणे आणि गूळ खा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे

छोटीशी भूक आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याचदा जंक फूड, फास्ट फूड, वेफर्स इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. बाहेरचे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याऐवजी गूळ-चणे खाणे हा सोपा आणि आरोग्याला गुणकारी ठरणारा पर्याय आहे. जाणून घेऊया, गूळ-चणे (Health Tips) खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गुणधर्म गूळ आणि चण्यांमध्ये असतात. चणे आणि गूळ रक्त वाढवण्याबरोबरच इतर शारीरिक समस्याही दूर होतात. गुळामुळे शरीराला आयर्न मिळते. त्यामुळे गूळ खाणं फायदेशीर ठरतं तसेच गुळामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

त्वचा, दात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवरही गूळ आणि चणे खाणे फायदेशीर ठरते. यामुळे अशक्तपणा दूर होतो. गुळामध्ये आयर्न, सोडियम, पोटॅशियम आणि इतरही अनेक जीवनसत्त्वे असतात.

गुळामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज आहारात गुळाचा समावेश करणे गुणकारी ठरते, तर चण्यांमध्ये कॅल्शियम असते तसेच फॉस्फरस, प्रथिने आणि आयर्नदेखील मुबलक प्रमाणात असतात.

चण्याच्या सेवनाने अनेक शारीरिक समस्या दूर व्हायला मदत होते. चणे शरीरातील रक्ताच्या पेशी तयार करण्यासाठी मदत करतात. चणए किडनीच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

(हेही वाचा – Tahawwur Rana : २६/११ च्या हल्ल्यातील संशयित तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या हालचालीला वेग )

दिवसभरात मूठभर चणे आणि दोन मध्यम आकाराचे गुळाचे खडे एकत्र खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतं. शरीराला आवश्यक असणारी सर्व पोषक तत्त्वे यामध्ये असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने ते औषधापेक्षा उत्तम काम करतात.

चणे आणि गुळामध्ये फायबर असतं. त्यामुळे पचनक्रिया उत्तम होण्यासाठी मदत होते. दात आणि हाडांसाठी हे दोन्ही पदार्थ अत्यंत फायदेशीर आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.