Doping in Athletics in India : उत्तेजक चाचणीच्या भीतीने स्थानिक ॲथलेटिक्स स्पर्धेत स्पर्धकच पळून गेले

Doping in Athletics in India : उत्तेजक चाचणीच्या भीतीने दिल्लीतील एका स्थानिक ॲथलेटिक्स स्पर्धेत पुरता गोंधळ उडाला. शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत तर अवघा एकच धावपटू धावला

189
Doping in Athletics in India : उत्तेजक चाचणीच्या भीतीने स्थानिक ॲथलेटिक्स स्पर्धेत स्पर्धकच पळून गेले
Doping in Athletics in India : उत्तेजक चाचणीच्या भीतीने स्थानिक ॲथलेटिक्स स्पर्धेत स्पर्धकच पळून गेले

ऋजुता लुकतुके

भारतातील एका राज्याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू होणार होती. (Doping in Athletics in India) ठरल्याप्रमाणे स्पर्धक त्यांचे पालक आणि प्रशिक्षकही स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. पण, ऐन स्पर्धा सुरू होताना तिथे कसा माहौल निर्माण झाला बघा ! शंभर मीटर धावण्याची स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अंतिम फेरीच्या आठ पैकी सात धावपटूंनी आपल्या पायात गोळे आले आहेत, असं सांगून स्पर्धेतून माघार घेतली. ललित कुमार हा एकमेव स्पर्धक उरला. त्याला न धावताच विजेता घोषित करावं लागलं. (Doping in Athletics in India)

त्यानंतर स्टीपलचेज प्रकारात एक मुलगी अंतिम रेषा ओलांडली तरी धावतच सुटली, ती थांबेचना. असा आणखी बराच गोंधळ झाल्यानंतर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला तर तिथेही विजेते खेळाडूही गायब झाले.

(हेही वाचा – Arvind Kejriwal : दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांनंतर आता मुख्यमंत्र्यांची भ्रष्टाचाराच्या प्रकरणी चौकशी; सीबीआयने मागवली ‘ही’ माहिती)

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडिअमवर हा सगळा गोंधळ उडाला तो राज्यस्तरीय या स्पर्धेच्या ठिकाणी उत्तेजक चाचणी प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अचानक पोहोचल्यामुळे. ते रक्त आणि लघवीचे नमुने मागतील या भीतीने खेळाडूंची अशी तारांबळ उडाली. पण, झालेला प्रकार गोंधळाचा आणि तितकाच लाजिरवाणा होता कारण, जवळ जवळ सगळ्याच खेळाडूंना उत्तेजक चाचणीची भीती वाटत होती. वर स्टीपल चेजच्या अंतिम फेरीचा जो गोंधळ सांगितला, तो याच प्रकारातील होता. त्या मुलीच्या मागे उत्तेजक चाचणी प्रतिबंधक विभागाने अधिकारी लागले होते. त्यांनी नियमाप्रमाणे लघवीचा नमुना मागितला. तर ती खेळाडू धावतच सुटली. शेवटी तिच्या मागे ते अधिकारी धावले आणि त्यांनी तिला पकडलं. (Doping in Athletics in India)

इंडियन एक्सप्रेस या आघाडीच्या वृत्तपत्राने २६ सप्टेंबरला ही लाजिरवाणी बातमी दिली आहे. मूळात नाडाचं पथक स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचलं ते जवाहर लाल नेहरु स्टेडिअममधील एका व्हायरल व्हीडिओमुळे. हा व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता.

या व्हिडिओमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडिअमचं शौचालय दाखवण्यात आलं आहे. तिथं अनेक सिंरिंज पडलेल्या दिसतायत. तसंच ईपीओ नावाचं एक कामगिरी उंचावणारं औषधही तिथं पडलं होतं. या व्हायरल व्हिडिओ नंतर दिल्ली ॲथलेटिक्स असोसिएशनने नाडा अर्थात उत्तेजक चाचणी प्रतिबंधक राष्ट्रीय यंत्रणेला बोलावून घेतलं होतं. ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप मेहता यांनी एएफपी वृत्तसंस्थेला याविषयी माहिती दिली.

‘नाडाच्या अधिकाऱ्यांनी उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी यावं असं पत्र आम्ही नाडाला लिहिलं होतं. त्याप्रमाणे कुणालाही न कळवता ते स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इथं आले. त्यानंतर खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणीच्या वेळी गायबच होत होते. पण, अशा खेळाडूंची चाचणी करण्याचा पूर्ण अधिकार नाडाला आहे. चाचण्यांमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूंवर आम्ही नक्कीच कारवाई करू,’ असं संदीप मेहता म्हणाले. (Doping in Athletics in India)

भारत आणि डोपिंग

दुर्दैवाने भारतीय ॲथलेटिक्सला उत्तेजक चाचणीचा शाप पूर्वीपासून आहे. जगात रशियानंतर उत्तेजक द्रव्य सेवनाचा सर्वाधिक आरोप भारतीय ॲथलीट्सवर होतो. यंदाही ऑगस्ट महिन्यात आघाडीची धावपटू द्युती चंद दोन महिन्यांपूर्वीच उत्तेजक द्रव्य सेवनाच्या आरोपावरुन निलंबित झाली आहे. तिला चार वर्षं ॲथलेटिक्सपासून दूर रहावं लागणार आहे. यावर्षी डोपिंगमुळे कारवाई झालेल्या भारतीय खेळाडूंची संख्या आहे ४५. जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था अर्थात वाडाच्या ताज्या अंकातही भारतातील उत्तेजक द्रव्य सेवनाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (Doping in Athletics in India)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.