World Health Organization: जगातील प्रत्येकी ३ पैकी १ व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

125
World Health Organization: जगातील प्रत्येकी ३ पैकी १ व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती
World Health Organization: जगातील प्रत्येकी ३ पैकी १ व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण, जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

जगभरातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची आतापर्यंतची मोठी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, १९९० ते २०१९ दरम्यान उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या १३० कोटींवर पोहोचली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याचे माहित नसते. बीपी म्हणजेच रक्तदाबावर नियंत्रण असते, तर आज हे लोक दगावले नसते असे मत याबाबत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात तब्बल १८ कोटी ८० लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत. जगातील ३० ते ७९ वर्षे वयोगटातील उच्च रक्तदाब रुग्णांपैकी केवळ अर्धे म्हणजे ५४ टक्के रुग्णांना त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे माहीत आहे. उच्च रक्तदाबावर उपचार घेत असलेल्यांची संख्या ४२ टक्के असून २१ टक्के रुग्णांचे रक्तदाबावर नियंत्रण आहे.

(हेही वाचा –  Ganesh Visarjan 2023 : गणेश विसर्जनासाठी २० हजार मुंबई पोलीस सज्ज)

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जीवनशैलीच्या आजारांमुळे अकाली मरण पावलेल्या लोकांची एकूण अंदाजे संख्या २२ टक्के आहे. यापैकी २५ टक्के पुरुष आणि १९ टक्के महिला असतील. २०१९च्या आकडेवारीनुसार, भारतात २५ लाख ६६ हजार लोक ह्रदयविकाराचे बळी ठरले आहेत. त्यापैकी १४ लाख ५१ हजार पुरुष आणि ११ लाख १६ हजार महिला आहेत. २०१९ मध्ये भारतात ह्रदयविकारामुळे झालेल्या ५२ टक्के मृत्यूमागे उच्च रक्तदाब हे मोठे कारण होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार….
– ५ पैकी ४ लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत.
– जगात प्रत्येकी ३ पैकी १ व्यक्ती उच्च रक्तदाबाचा रुग्ण
– ५० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती नाही
– उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक, ह्रदयविकाराचा झटका, किडनीच्या आरोग्याला धोका

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.