सध्या एटीएम आणि यूपीआयचा जमाना असल्याने सर्वसामान्य खिशामध्ये जास्त पैसे किंवा पाकीट देखील बाळगत नाही. त्यामुळे पूर्वीसारखे पाकीटमारांचे फायदे होत नसल्याने मुंबईमध्ये विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकांचा फायदा उचलत मोबाईल चोरीच्या मोठ्या घटना समोर येतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी मोबाईल चोरीच्या आकड्यांकडे पाहिल्यानंतर हे आकडे फार मोठे दिसून येतात. मोबाइल चोऱ्या करणाऱ्या महिला आणि तरुणांची टोळी मिरवणुकीत सामील झालेली असते. मिरवणुकीत ते वेगवेगळ्या भागात गटाने फिरतात. मोठी गर्दी असलेल्या भागात ही टोळी थांबते. तरुण-तरुणी गर्दीत नाचत असताना बेसावध असणाऱ्या नागरिकांना लक्ष करून त्यांचे मोबाइल लंपास केले जातात. महिलांसोबत हे चोरटे असल्याने त्यांच्यावर कोणाला संशयही येत नाही. चोरटे मोबाइल लंपास करून महिलांकडे ठेवण्यासाठी देतात.
(हेही वाचा-Rohit Pawar : रोहित पवारांना धक्का! मध्यरात्री २ वाजता मिळाली नोटीस)
विशेषत: या टोळ्या विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दिवशी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. या वर्षी गणेश उत्सव सुरू झाल्यापासून हे चोरटे सक्रिय झाले आहेत. सध्या एटीएम कार्ड आणि यूपीआयचा जमाना असल्याने सर्वसामान्य लोक हे आपल्या पाकिटामध्ये जास्त पैसे बाळगत नाहीत. त्यामुळे गर्दीचा फायदा उचलत या पाकीटमारांना रिस्क उचलून देखील काहीच फायदा होत नाही. सध्या डिजिटल चा जमाना असल्याने आणि सोशल मीडिया वरती आपले फोटो अपलोड करण्यासाठी गणेशभक्त आपला मोबाईल सोबतच बाळगतात. मोबाईलच्या किमती देखील सध्या लाखा लाखाच्या घरात आहेत. याची विक्री करून त्यांना काही हजारांचा देखील फायदा होतो. या चोरांची टोळी सध्या गणेशोत्सवात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.
गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवान वस्तू आणि मोबाइल चोरी करण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खासगी वेशात पोलिस गर्दीत फिरत असले, तरी त्याचा चोरट्यांना काही फरक पडत नाही. त्यामुळे नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीत आपल्या मौल्यवान वस्तू आणि मोबाइल सांभाळावेत. तसेच, संशयास्पद वस्तू आढळल्यास तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी.