Mumbai Cha Raja Visarjan : मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीत शिवराय प्रकटले; नाचगाणे थांबवून गणेशभक्त शांत राहिले

309
Mumbai Cha Raja Visarjan : मुंबईचा राजा विसर्जन मिरवणुकीत शिवराय प्रकटले; नाचगाणे थांबवून गणेशभक्त शांत राहिले

मागील १० दिवस आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा करून आज त्याला (Mumbai Cha Raja Visarjan) निरोप देण्यासाठी सर्व भाविक सज्ज झाले आहेत. अशातच मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेश गल्लीच्या बाप्पाच्या मिरवणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. भक्तांच्या गर्दीत, नाचत गाजत मुंबईचा राजा प्रवास करत आहे.

बाप्पा त्याच्या या प्रवासात अनेक छोट्या छोट्या टप्प्यांवर आपल्या भक्तांना (Mumbai Cha Raja Visarjan) भेटण्यासाठी थांबतो. यावेळी त्याच्यावर कोणी पुष्पवृष्टी करतं, तर कोणी गुलालाची उधळण करत. मात्र यावर्षीच्या मिरवणुकीत चक्क शिवाजी महाराज प्रकटलेले आपल्याला दिसले. यावेळी उपस्थित भक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. विशेष म्हणजे काही वेळेसाठी सर्व गणेशभक्तांनी नाचगाणे थांबवून आपल्या स्वराज्याचे महत्व जाणून घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या राजाने आपल्या पुढच्या प्रवासाला तितक्याच आनंदाने आणि जल्लोषात सुरुवात केली.

(हेही वाचा – Ganesh Visarjan 2023 : बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबई सज्ज; ‘या’ रस्त्यांवर असणार ‘नो एन्ट्री’)

मुंबईच्या राजाचा इतिहास

१९२८ साली मुंबईच्या राजाची (Mumbai Cha Raja Visarjan) स्थापना करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने स्वराज्य निर्मितीची चळवळ म्हणून हा उत्सव सुरु करण्यात आला होता. कोकणातून मुंबईमध्ये आलेल्या मध्यमवर्गीय मराठी माणसांनी या मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला गणेश गल्लीचा बाप्पा हा केवळ पाच दिवसांचा होता. कालांतराने या मंडळाचा विस्तार होत गेला, आणि गणेश गल्लीचा गणपती मुंबईचा राजा झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.