PM Narendra Modi : मोदींच्या आवाजात ऐका हुतात्मा भगतसिंग यांचा गौरव

141
PM Narendra Modi : मोदींच्या आवाजात ऐका हुतात्मा भगतसिंग यांचा गौरव

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणारे क्रांतिकारक भगत सिंग यांच्या ११६ व्या जयंती निमित्त (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विटरवर संदेश जारी करत भगत सिंग यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) भगत सिंग यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करतो.. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे बलिदान आणि सर्वोच्च समर्पण भावी पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत राहील. धैर्याचे मूर्तिमंत रूप म्हणून भगत सिंग नेहमीच न्याय आणि स्वातंत्र्यासाठी भारताच्या लढ्याचे प्रतीक असतील असे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

(हेही वाचा – Rohit Pawar : रोहित पवारांना धक्का! मध्यरात्री २ वाजता मिळाली नोटीस)

क्रांतिकारक भगतसिंग यांचा जन्म तत्कालीन संयुक्त पंजाबमधील लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावातील एका क्रांतिकारी कुटुंबात झाला. भगत सिंग (PM Narendra Modi) यांचे वडिल सरदार किशन सिंग आणि आई विद्यावती यांच्यातील देशभक्ती भगत सिंगमध्ये जन्मजात अवतरली होती. त्यांचे काका सरदार अजित सिंग देखील क्रांतिकारक होते. भगत सिंगच्या जन्माच्या दिवशी वडील आणि काका तुरुंगातून सुटले, म्हणूनच त्यांचे नाव भाग्यवान असे पडले. त्यामुळेच त्यांचे नाव भगतसिंग ठेवण्यात आले. भगत सिंग यांनी साँडर्स नामक ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध केला होता. तसेच संसद भवनात बॉम्ब फेकून सरकारचा निषेध नोंदवला होता. भगत सिंग यांच्यासह शिवराम हरि राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी २३ मार्च, १९३१ रोजी लाहोर कारागृहात फाशी दिली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.