Manipur Violence : ‘पहिले पाढे पंचावन्न’; पुन्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

151
Manipur Violence : 'पहिले पाढे पंचावन्न'; पुन्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

ईशान्येकडील मणिपूर (Manipur Violence) राज्यात दोन जातीय गटांमधील वाद अजूनही सुरूच आहे. राज्यात मागील चार महिन्यांपासून हिंसाचार सुरूच आहे. मात्र अजूनही तिथे तणावपूर्ण वातावरण कायम आहे.

मणिपूरमध्ये (Manipur Violence) पुन्हा एकदा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे. मणिपूरमध्ये बुधवार २७ सप्टेंबरला जमावाने एका नेत्याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांची गाडीही जाळली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे.

(हेही वाचा – Dr. Swaminathan : स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला – मुख्यमंत्री)

पहिले पाढे पंचावन्न …

जखमी आंदोलकांबाबत मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं की, “जर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर (Manipur Violence) गोळ्या किंवा कोणत्याही प्राणघातक शस्त्राचा वापर केला असेल, तर सरकार ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. आंदोलकांना गंभीर दुखापत झाल्यास, चौकशी केली जाईल आणि संबंधितांना न्यायच्या कक्षेत आणले जाईल.” सुरक्षा दलांवर लोखंडी वस्तू फेकल्या गेल्या, ज्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले, अशी माहिती मिळाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.