Ganesh Visarjan 2023 : जुहू चौपाटीवर वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू

101

गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी समुद्र चौपाट्यांसह विसर्जन स्थळांवर (Ganesh Visarjan 2023) भक्तांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती. मात्र, बाप्पांना निरोप देण्यासाठी जमलेल्या भाविकांपैंकी एकावर जुहू चौपाटीवर काळाने झडप घातली. गुरुवारी दुपारी साडेतीनचय सुमारास एक सोळा वर्षीय तरुण पाण्यात जखमी अवस्थेत आढळून आला.  या तरुणाला कुपर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हसन युसुफ शेख असे या तरुणाचे नाव असून तो गणपती विसर्जनासाठी खासगी मंडळाचा स्वयंसेवक होता. या तरुणावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan 2023) घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे दाखल होऊ लागले. त्यामुळे भाविकांची गणेश मूर्ती विसर्जनासाठी चौपाटीवर गर्दी होत असताना दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुपारी साडेतीनच्या सुमारास एक भाविक पाण्यात पडलेला आढळून जीवरक्षकांना दिसून आला. त्यामुळे दृष्टी लाईफ गार्डने तातडीने समुद्रातील पाण्यातून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून कुपर रुग्णालयात दाखल केले.  या जखमीला रुग्णालयात दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले. हसन  युसुफ शेख  हा गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता असून मंडळाचा स्वयंसेवक म्हणून चौपाटीवर विसर्जनात सहभागी झाला होता,अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. याठिकाणी या तरुणाच्या अंगावर वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा Ganesh Visarjan 2023 : गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.