शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर धमकी दिली. त्याच्याकडून एक ऑडिओ जारी करण्यात आला आहे. क्रिकेट विश्वचषक नाही, तर दहशतवाद विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामन्याच्या दिवशी खलिस्तानी (Khalistani) झेंड्यांचा महापूर येणार आहे. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असे पन्नूने म्हटले.
पन्नूचा हा ऑडिओ त्याच्या समर्थकांकडून वेगवेगळ्या आयडीवरून व्हायरल केला जात आहे. 5 ऑक्टोबरपासून आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 सुरू होत आहे. तब्बल 12 वर्षांनंतर भारतात 50 षटकांचा क्रिकेट विश्वचषक खेळवला जात आहे. 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. येथे पहिला सामना गेल्या विश्वचषकाची अंतिम फेरी खेळलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
(हेही वाचा Canada : कॅनडात खलिस्तानी झाले हैराण; कारण…)
Join Our WhatsApp Community