मागील दहा दिवसांपासून लाडू, मोदकांसह पंच पक्वानांच्या आस्वादासह पाहुणचार घेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पा आपल्या गावाला निघाले आहे. बाप्पांचे आगमन झाल्यापासून त्यांची मनोभावे सेवा करणाऱ्या भक्तांनी वाजत गाजत मिरवणूक काढत त्यांना निरोप दिला. अधून मधून येणाऱ्या मुसळधार पावसाच्या सरींमध्ये भिजतच भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत,गुलालांची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाsss, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात पुढच्या वर्षी लवकर या… अशी आर्जवी करत त्यांचा निरोप घेतला.
(हेही वाचा Khalistani : दहशतवादी पन्नूची धमकी; निज्जरच्या हत्येचा बदला घेणार, क्रिकेट विश्वचषक करणार लक्ष्य)
Join Our WhatsApp Community