Ind vs Aus ODI Series : तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर सोशल मीडियावर भन्नाट मिम्स

Ind vs Aus ODI Series : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली. पण, तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. आणि त्यानंतर संघाच्या काही निर्णयांवर सोशल मीडियात टीका होत आहे

174

ऑस्ट्रेलिया विरुद्ध राजकोट एकदिवसीय सामन्यात Ind vs Aus ODI Series भारतीय डाव सुरू झाला तेव्हा कर्णधार रोहीत शर्माच्या बरोबरीने चक्क वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला. चाहत्यांसाठी हा एक धक्काच होता. कारण, सुंदर हा काही नियमित सलामीचा फलंदाज नाही.

भारतीय संघ प्रशासनाने हा निर्णय घेतला तो पाठीमागचे फलंदाज विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांना त्यांच्या आवडीच्या जागी खेळता यावं म्हणून. शिवाय सुर्यकुमार आणि रवी जाडेजाचा क्रमांकही त्यांना बदलायचा नव्हता. पण, वॉशिंग्टन सुंदरला सलामीला आलेलं पाहून सोशल मीडियावर मात्र हास्याचा चित्कार झाला. वॉशिंग्टनने ३० चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. म्हणजे, दिलेली जबाबदारी पार पाडण्यात तो अयशस्वी ठरला.

यावर विकी चंदानी या चाहत्याने वॉशिंग्टन सलामीला आल्यावर रोहीत शर्मचा चेहरा कसा झाला, असं म्हणत एक मिम शेअर केलं आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने केलेल्या ९६ धावा आणि लेबुशेनच्या ७२ धावा यामुळे त्यांनी ७ बाद ३५२ असा धावांचा डोंगर उभा केला होता. आणि त्याला उत्तर देताना भारतीय संघालाही चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मधल्या फळीतही डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियन डावाला दिशा आणि आकार देण्याचं काम केलं.

(हेही वाचा Ganesh Visarjan 2023 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…विसर्जनाचे सचित्र क्षण पहा)

पण, ऑस्ट्रेलियान धावसंख्येला उत्तर देताना भारतीय फलंदाजी मात्र गडबडली. त्यामुळे भारतीय कामगिरीवर सोशल मीडियावर हास्याचा महापूर आला आहे. आणखी एका चाहत्याने वॉशिंग्टन सुंदरला सलामीला पाठवण्याच्या चालीवर टिका केलीय.

राजकोटमध्ये बुधवारचा दिवस उष्म्याचा होता. आणि त्यामुळे खेळाडू तसंच फलंदाजांची दमछाकही होत होती. अनेकदा दोन षटकांच्या मध्ये खेळाडूंना पाणी लागत होतं. ही गोष्टही चाहत्यांच्या नजरेतून सुटली नाही. अखेर या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला.

आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांचा Ind vs Aus ODI Series हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. आणि विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना एकमेकांविरोधातच होणार आहे. ८ ऑक्टोबरला चेन्नईत हा सामना होणार आहे. चेन्नईतील वातावरणही उकाडा आणि आर्द्रतेचंच असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.