Dadar Station: प्रवाशांना दिलासा, ‘दादर’ रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय

प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

154
Dadar Station: प्रवाशांना दिलासा, 'दादर' रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय
Dadar Station: प्रवाशांना दिलासा, 'दादर' रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय

मुंबईतलं दादर रेल्वे स्थानक (Dadar Station) सर्वात रहदारीचं रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानकावरून प्रवाशांना मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवरून प्रवास करता येतो. पश्चिम रेल्वेमार्गावर मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकापासून ते अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि पुढे गुजरातलाही जाता येते. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी दादर स्थानक महत्त्वाचे आहे, पण एखादा प्रवासी दादर रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्याला नेमकं कुठे जायचं आहे, हे इतके प्लॅटफॉर्म पाहून त्याचा गोंधळ उडतो.

दादर रेल्वे स्थानकावरून छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला जाता येतं. या मार्गाने कुर्ला रेल्वे स्थानकाला जाऊन हार्बर मार्गाने पनवेल ते चुनाभट्टी अशा मार्गाने प्रवास करू शकतो. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे रेल्वे स्थानकही हार्बर रेल्वे मार्गाला जोडतो. त्यामुळे या रेल्वे स्थानकावरही दादर रेल्वे स्थानकावरून जाऊ शकतो. याशिवाय दादर रेल्वे स्थानकावरून कल्याण, कसारा, खोपोलीला जाऊ शकतो. कल्याणच्या पुढे दोन वेगळे मार्ग होतात. एक मार्ग नाशिकच्या दिशेला जातो. त्यामुळे दादर स्थानकात दिवस-रात्र प्रवाशांची गर्दी असते.

याशिवाय दादर रेल्वे स्थानकावरून कल्याण, कसारा, खोपोलीपर्यंतचा प्रवास करता येतो. कल्याणच्या पुढे दोन वेगळे मार्ग होतात. एक मार्ग नाशिकच्या दिशेला जातो, तर दुसरा मार्ग पुण्याच्या दिशेला जातो. हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे आहे. अनेक हजारो किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा प्रवास याच मार्गातून सुरू होतो. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक अतिशय महत्त्वाचं स्थानक आहे.

महत्त्वाचा निर्णय…
मध्य, पश्चिम रेल्वे मार्ग आणि लांब पल्ल्याचे अनेक प्लॅटफॉर्म दादरमध्ये असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. नवीन आलेल्या प्रवाशांना कोणत्या रेल्वे स्थानकावर जायचं हे लक्षात येत नाही. मुंबईकरांचा याबाबतीत काही गोंधळ उडतो. काही वेळा पश्चिम रेल्वेने जाणारा प्रवासी मध्य रेल्वेच्या, तर मध्ये रेल्वेने जाणारा प्रवासी पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर उतरतो. प्रवाशांचा हा गोंधळ टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वे स्थानकाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला आता सरसकट अनुक्रमे क्रमांक देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा बदल ९ डिसेंबरपासून होणार आहे.

टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील धिम्या मार्गावरील पहिल्या प्लॅटफॉर्मला आता आठवा क्रमांक असेल. त्यानंतर टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १४ असेल. हे सर्व बदल केंद्रीय रेल्वे सूचना प्रणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही होतील तसेच पादचारी पूल आणि दिशादर्शक फलकांवरही सुधारून नव्याने दिले जातील.

फलाट क्रमांक ‘असे’ असतील
पश्चिम रेल्वे : १ ते ७ प्लॅटफॉर्म
मध्य रेल्वे : ८ ते १४ प्लॅटफॉर्म

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.