गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या दिवसांत दडी मारून बसलेला पाऊस (Monsoon Update) राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वी राज्यात १४ सप्टेंबरपासून पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने आपली हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने सांगितल्या नुसार राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरीही काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना मिळाला यलो अलर्टचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Monsoon Update) शक्यता आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील. गुरुवारीही मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. आज ठाणे जिल्ह्याला आयएमडीने (Monsoon Update) येलो अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Visarjan 2023 : ‘या’ कारणामुळे लालबागसह अनेक मोठ्या मुर्त्यांचे विसर्जन रखडले)
Maharashtra | IMD issued an Orange alert for Ratnagiri and a Yellow alert for Mumbai, Thane, Raigad and Palghar for September 28. pic.twitter.com/pd3f915MN8
— ANI (@ANI) September 27, 2023
मान्सूनचा परतीचा प्रवास…
हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात होणार असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात होणार आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही (Monsoon Update) उशिराने म्हणजेच १०ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
थोडक्यात एकीकडे राज्यात सध्या मान्सूनचाच पाऊस (Monsoon Update) सुरु असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे देशाच्या उत्तरेकडे आतापासूनच हवामान बदलण्यास सुरुवात झाली असून, थंडीची हलकी चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community