Asian Games 2023 : जाणून घ्या २९ सप्टेंबरचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक

180
Asian Games 2023 : जाणून घ्या २९ सप्टेंबरचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक
ऋजुता लुकतुके

होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी सहावा दिवस आहे. अशातच आज सगळ्यांच्या नजरा असतील त्या रामकुमार रामनाथन आणि साकेत मानेनी यांच्या टेनिस दुहेरीच्या अंतिम फेरीकडे. भारताला इथं सुवर्णाची अपेक्षा असेल. त्याचबरोबर आजपासून ॲथलेटिक्सच्या विविध क्रीडाप्रकारांच्या प्राथमिक स्पर्धा सुरू होत आहेत. आता बघूया २९ सप्टेंबरचं भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक…

गोल्फ

पहाटे ४ वाजता – पी शरथ, ए प्रशांत व अदिती अशोक यांची महिला वैयक्तिक तसंच सांघिक (Asian Games 2023) स्पर्धेची दुसरी फेरी

अनिर्बन लाहिरी, एसएसपी चौरासिया, खालिन जोशी व शुभंकर शर्मा पुरुषांची वैयक्तिक तसंच सांघिक दुरी फेरी

ॲथलेटिक्स

पहाटे ४ वाजून ३० मिनिटं – संदीप कुमार, (Asian Games 2023) विकास सिंग यांची २० किमी चालण्याची स्पर्धा अंतिम फेरी

पहाटे ४ वाजून ४० मिनिटं – प्रियंका २० किमी चालण्याची अंतिम फेरी

दुपारी ४ वाजून ३० मिनिटं – ऐश्वर्या मिश्रा – महिलांची ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट १)

दुपारी ४ वाजून ४० मिनिटं – रचना कुमारी, तान्या चौधरी – महिलांची हातोडा फेक अंतिम फेरी

दुपारी ४ वाजून ४६ मिनिटं – हिमांशी मलिक – महिलांची ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट ३)

दुपारी ४ वाजून ५५ मिनिटं – महम्मद अनस याहिया – पुरुषांची ४०० मीटर (हिट १)

संध्याकाळी ५ वाजून ३ मिनिटं – महम्मद अजमल – ४०० मीटर धावण्याची शर्यत (हिट २)

संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटं – किरण बलियन, मनप्रीत कौर – महिलांची शॉटपुट अंतिम फेरी

नेमबाजी

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – दिव्या पीएस, (Asian Games 2023) ईशा सिंग व पलक – महिलांची १० मीटर एअर पिस्तुल वैयक्तिक व सांघिक पात्रता फेरी व अंतिम फेरी

ऐश्वरी प्रताप तोमर, स्वप्निल कुसळे, अखिल शेरॉन – पुरुषांची ५० मीटर रायफल थ्री पोझिशन – वैयक्तिक व सांघिक पात्‌रता व अंतिम फेरी

ब्रिज

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – जॅगी शिवदासानी, संदीप ठकराल, राजेश्वरी तिवारी, सुमित मुखर्जी, राजू तोलानी, अजय खरे – पुरुषांची सांघिक स्पर्धा पात्रता फेरी

करिण नादर, बी सत्यनारायणन, हिमानी खंडेलवाल, राजीव खंडेलवाल, मरियन करमरकर, संदीप करमरकर – मिश्र सांघिक स्पर्धा पात्रता फेरी

सकाळी ११ वाजता – आशा शर्मा, पूजा बात्रा, भारती डे, अलका क्षीरसागर, कल्पना गुर्जर, विद्या पटेल – महिलांची प्राथमिक सहावी, सातवी फेरी

बॅडमिंटन

सकाळी ६ वाजून ३० मिनिटं – भारत वि. थायलंड – महिला सांघिक उपउपान्त्य फेरी

दुपारी २ वाजून ३० मिनिटं – भारत वि नेपाळ – सांघिक उपउपान्त्य फेरी

लॉन टेनिस

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – रामकुमार रामनाथन व साकेत मानेनी वि. जेसन युंग व यु सियू सू (चीन तैपई) – पुरुषांची दुहेरीतील अंतिम फेरी

दुपारी १२ नंतर – रोहन बोपान्ना व ऋतुजा भोसले वि. यु सियू सू व हाओ चिंग चँग (चीन तैपई) – मिश्र दुहेरीची उपान्त्य फेरी

जलतरण

सकाळी ७ वाजून ३० मिनिटं – निना वेंकटेश – महिलांची ५० मीटर बटरफ्लाय (हिट २)

सकाळी ८ वाजून ४ मिनिटं – व्रित्ती अगरवाल – महिलांची ८०० मीटर फ्रीस्टाईल (हिट २)

सकाळी ८ वाजून १८ मिनिटं – अद्वैत पागे – पुरुषांची २०० मीटर पुरुषांची बॅकस्ट्रोक (हिट १)

श्रीहरी नटराज – पुरुषांची २०० मीटर बॅकस्ट्रोक (हिट ३)

सकाळी ८ वाजून ३२ मिनिटं – आर्यन नेहरा, कुशाग्रा रावत – पुरुषांची ४०० मीटर फ्रीस्टाईल (हिट ४)

सकाळी ९ वाजता – सुनील गौडा, साजन प्रकाश – पुरुषांची २०० मीटर बटरफ्लाय (हिट २ व ३)

सकाळी ९ वाजून १३ मिनिटं – महिला सांघिक ४x१०० मीटर मिडले रिले (हिट १)

टेबल टेनिस

सकाळी ८ वाजून १५ मिनिटं – मनिका बात्रा वि सुथासिनी सावेताबूत (थायलंड) – महिला एकेरी अंतिम १६ जणांची फेरी

सकाळी ९ वाजता – मनुष शाह व मानव ठक्कर वि. यू एन कोएन पँग व याँग क्वेक (सिंगापूर) – पुरुषांची दुहेरीची अंतिम १६ जणांची फेरी

सकाळी ९ वाजून ३५ मिनिटं – साथियन व सरथ वि. फॅन व वँग (चीन) – पुरुषांची दुहेरीतील अंतिम १६ जणांची फेरी

दुपारी १ वाजून ३० मिनिटं – श्रीजा अकुला व दिव्या चितळे वि मिवा व किहिरा (जपान) – महिलांची दुहेरीतील अंतिम १६ जणांची फेरी

दुपारी २ वाजून ५ मिनिटं – अथिका व सुतीर्था वि सावेताबूत व ऑविरील (थायलंड) – पुरुषांची दुहेरी अंतिम १६ जणांची फेरी

दुपारी २ वाजून ४० मिनिटं – साथियन वि वाँग चू चिन (चीन) – पुरुषांची अंतिम १६ जणांची फेरी

दुपारी ३ वाजून २५ मिनिटं – सरथ कलम वि चुनाग चिन युआन (चीन तैपई) – पुरुषांची एकेरी अंतिम १६ जणांची फेरी

स्कॉश

सकाळी ८ वाजून ३० मिनिटं – भारत वि. हाँग काँग महिलांची उपान्त्य फेरी

दुपारी ४ वाजता – भारत वि. मलेशिया पुरुषांची उपान्त्य फेरी

ई स्पोर्ट्स

सकाळी ११ वाजून ३० मिनिटं – भारत वि किरगिझस्तान DOTA2 अ गटातील पहिला सामना

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – भारत वि. फिलिपीन्स DOTA2 अ गटातील दुसरा सामना

(हेही वाचा – Monsoon Update : ठाणे, रायगडसह अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी)

मुष्टीयुद्ध

दुपारी १२ वाजता – परवीन वि. शिचून शू (चीन) – महिलांचा ५४-५७ किलो वजनी गट प्राथमिक फेरी

दुपारी १ वाजून ४५ मिनिटं – लक्ष्य चहर वि ओमुरबेक बेकझिगित उलू (किरगिझस्तान) – पुरुषांची ७१-८० किलो वजनी गटातील अंतिम १६ जणांची फेरी

संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटं – निखत झरिन वि हनन नासर (जॉर्डन) – महिलांची ४५-५० किलो वजनी गटातील उपउपान्त्य फेरी

सायकलिंग ट्रॅक

दुपारी १२ वाजून ६ मिनिटं – डेव्हिड बेकम – पुरुषांची केरिन पहिली फेरी (हिट २)

दुपारी १२ वाजून १२ मिनिटं – इसॉ आलबेन – पुरुषांची केरिन पहिली फेरी (हिट ३)

दुपारी ४ वाजून १५ मिनिटं – नीरज कुमार व हर्षवीर सिंग – पुरुषांची मॅडिसन अंतिम फेरी

बुद्धिबळ

दुपारी १२ वाजून ३० मिनिटं – पुरुषांची सांघिक पहिली फेरी

महिलांची सांघिक पहिली फेरी

हँडबॉल

दुपारी ३ वाजून ३० मिनिटं – भारत वि. चीन – बी गटातील महिलांची प्राथमिक फेरी

हॉकी

दुपारी ४ वाजता – भारत वि मलेशिया अ गटातील महिलांचा साखळी सामना

बास्केटबॉल ३ंx3

संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटं – भारत वि चीन – पुरुषांचा सी गटातील साखळी स्पर्धा

संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटं – भारत वि, मंगोलिया – महिलांची अ गटातील प्राथमिक फेरी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.