Mega Block : मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक वीकेंड, हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक

रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द

128
Mega Block : मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक वीकेंड, हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक
Mega Block : मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक वीकेंड, हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लॉक

मुंबई हार्बर मार्गावर उद्या, शनिवार, ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत ३८ तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या २ नवीन अप आणि डाउन लाइन्सच्या बांधकामासह पनवेल उपनगरीय रीमॉडेलिंग कामासाठी बेलापूर स्थानकाव्यतिरिक्त आणि पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे शनिवारी, ३० सप्टेंबर रोजी सीएसएमटीवरून शेवटची लोकल रात्री ९.०२ वाजता सुटणार आहे. ब्लॉक कालावधीत गाड्यांचे वेळापत्रक कसे असेल ते जाणून घेऊया –

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ९.०२ वाजता सुटेल आणि ३०.०९.२०२३ रोजी रात्री १०.२२ वाजता पनवेलला पोहोचेल. ब्लॉक कालावधीत हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील बेलापूर आणि पनवेल स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध होणार नाहीत. हार्बर मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/ओरीजनेट होतील. ट्रान्स हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा ठाणे आणि नेरुळ/वाशी स्थानकांदरम्यानच धावणार आहे.

(हेही वाचा – Asian Games 2023 : जाणून घ्या २९ सप्टेंबरचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक)

ब्लॉकच्या आधी पनवेलहून अप हार्बर मार्गावरून सुटणारी शेवटची लोकल शनिवारी, रात्री १०.३५ वाजता पनवेलहून सुटेल आणि रात्री ११.५४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ब्लॉकपूर्वी डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे येथून रात्री ९.३६ वाजता सुटेल आणि १०.२८ वाजता पनवेलला पोहोचेल.

ब्लॉकच्या आधी ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ९.२० वाजता सुटेल आणि ठाण्याला रात्री २२.१२ वाजता पोहोचेल. पनवेलसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.०८ वाजता सुटेल आणि दुपारी १.२९ वाजता पनवेल येथे पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेल येथून १.३७ वाजता सुटेल आणि २.५६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द

 ठाणे ते पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन १.२४ वाजता ठाण्याहून सुटेल आणि २.१६ वाजता पनवेलला पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलहून ठाण्याच्या दिशेने पहिली लोकल ट्रेन पनवेलहून २.०१ वाजता सुटेल आणि ठाण्यात २.५६ वाजता पोहोचेल. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर ११ सप्टेंबरपासून रात्रकालीन ब्लॉक सुरू करण्यात आला होता. पनवेल यार्डमध्ये रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाचपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.