राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) गटाचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. बारामती अॅग्रो ७२ तासांत बंद करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण विभागाने आमदार रोहित पवार यांना दिले आहेत. बारामती अॅग्रो कंपनीवर बुधवारी मध्यरात्री दोन वाजता प्रदूषण विभागाने धाड टाकत ही कारवाई केली. बारामती अॅग्रोवर झालेल्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली असून चर्चा सुरू झाल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता “त्यावर मी काही बोलणार नाही” असे त्यांनी म्हटले आहे.
कर्जत-जामखेडचे आमदार तसेच बारामती अॅग्रोचे ‘सीईओ’ म्हणून उत्कृष्ट प्रशासन कौशल्य असलेले रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे आहेत. पवार घराण्यातील नव्या पिढीचा शिलेदार म्हणून रोहित पवारांकडे पाहिले जाते. त्यातच अजित पवार यांची दोन्ही मुले राजकारणात आपली फारशी चमक दाखवू शकले नाहीत. शरद पवार यांनीदेखील रोहित पवार यांना राजकारणात येताना झुकते माप दिल्याचे बोलले जाते. त्यातच २०१९च्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पराजयामागेदेखील शरद पवारांची खेळी असल्याचेदेखील दबक्या आवाजात बोलले जाते.
(हेही वाचा – India vs Canada : अखेर कॅनडा नरमला; पीएम ट्रुडो यांनी घेतली ‘ही’ भूमिका)
शरद पवार नक्की असं का म्हणाले…
रोहित पवार यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण विभागाकडून रात्री दोन वाजता ७२ तासांमध्ये बारामती अॅग्रोचा प्लांट बंद करण्याची नोटीस देण्यात आली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. ही कारवाई दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. राजकीय सूडबुद्धी मुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचं देखील रोहित पवार म्हणाले. नक्की त्यांचा रोख कोणाकडे होता काय पवार कुटुंबामध्ये असलेल्याच व्यक्ती हा नेता आहे का ? ज्यामुळे शरद पवार यांनी या विषयावरून कुटुंबात वाद नको आणि माध्यमांसमोर बोलणे टाळले असा निष्कर्ष देखील काढला जात आहे. अजित पवार सत्तेत सामील होऊन उपमुख्यमंत्री झाल्यापासून रोहित पवार हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचे रोहित पवार सांगतात. त्यांनी देखील थेट कोणाचेही उघड उघड नाव घेतले नव्हते परंतु त्यांचा रोख कोणाकडे आहे याबद्दल राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
हेही पहा –