Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची झळ थेट मुख्यमंत्र्यांनाही; CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला

145
Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची झळ थेट मुख्यमंत्र्यांनाही; CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला

ईशान्येकडील मणिपूर (Manipur Violence) राज्यात दोन जातीय गटांमधील वाद अजूनही सुरूच आहे. राज्यात मागील चार महिन्यांपासून हिंसाचार सुरूच आहे. मात्र अजूनही तिथे तणावपूर्ण वातावरण कायम आहे.

काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये (Manipur Violence) जमावाने एका नेत्याच्या घरावर हल्ला केला आणि पोलिसांची गाडीही जाळली. काही ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाल्याचं समोर आलं आहे. आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्या जाळल्या. तणावाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला आहे.

तर आता दुसरीकडे काही आंदोलकांनी मुख्यमंत्री बिरने सिंह (Manipur Violence) यांच्या वडिलोपार्जित घरावरच हल्ला केला आहे. त्यांच्या घराबाहेर स्फोटकंही फोडण्यात आली.

(हेही वाचा – India vs Canada : अखेर कॅनडा नरमला; पीएम ट्रुडो यांनी घेतली ‘ही’ भूमिका)

मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला

अधिक माहितीनुसार, आक्रमक झालेल्या एका गटानं मुख्यमंत्री बिरेन सिंह (Manipur Violence) यांच्या इंफाळ येथील वडिलोपार्जित घरावर हल्ला केला. सुदैवाने यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हतं, गुरुवारी (२८ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केला. पण हल्लेखोरांनी घराबाहेर स्फोटकांचे स्फोट घडवून आणले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी अचानक दोन गट विविध दिशांनी (Manipur Violence) मुख्यमंत्र्यांच्या घराकडे धावून आले. पण त्यांना काही अंतरावरच पोलिसांनी रोखलं. तसेच त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या. त्यानंतर या संपूर्ण भागाची वीज बंद करण्यात आली. यावेळी बंडखोरांनी रस्त्याच्या मध्ये टायर जाळले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.