India vs Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांची पोलखोल; भारतावरील आरोप ठरला बिनबुडाचा

161
India vs Canada : कॅनडाच्या पंतप्रधानांची पोलखोल; भारतावरील आरोप ठरला बिनबुडाचा

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा (India vs Canada) यांच्यात वाद सुरु आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर या वादाला सुरुवात झाली. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला, तेव्हापासून दोन्ही देशाचे संबंध कमालीचे ताणले गेले. यावेळी दोन्ही देशांकडून वेगवेगळे निर्णय घेतले गेले. मात्र आता कॅनडाच्या पंतप्रधानांचं पितळ उघडं पडलं आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या मुलाने म्हणजेच बलराज सिंग निज्जर केलेल्या एका वक्तव्यामुळे कॅनडा तोंडघाशी पडला आहे.

काय म्हणाला निज्जरचा मुलगा?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर हा कॅनडाच्या (India vs Canada) गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असल्याचा दावा निज्जरच्या मुलाने केला आहे. तसेच पुढे बोलतांना बलराज सिंग निज्जरने सांगितले की; “निज्जर आणि कॅनडाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचीही अनेकदा भेट झाली.

बलराजसिंह निज्जरने दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये हरदीप सिंग (India vs Canada) हत्येच्या एक-दोन दिवस आधी कॅनेडियन सिक्युरिटी इंटेलिजन्स सर्व्हिस (CSIS) अधिकाऱ्यांशी बोलले होते. मात्र, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हे सत्य आतापर्यंत जगापासून लपवून ठेवलं आहे.

(हेही वाचा – India vs Canada : अखेर कॅनडा नरमला; पीएम ट्रुडो यांनी घेतली ‘ही’ भूमिका)

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो तोंडघशी पडले…

निज्जरच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार कॅनडाने भारतावर बिनबुडाचे (India vs Canada) आरोप लावल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारत आणि कॅनडाच्या वादाला वेगळं वळण मिळालं आहे.

निज्जरची वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत भेट

बलराजसिंह निज्जरने कॅनेडियन मीडियाला सांगितलं की, हरदीप सिंग (India vs Canada) निज्जरने हत्येच्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. गुप्तचर अधिकाऱ्यांनी निज्जर यांना घरीच राहण्याचा सल्ला दिल्याचा दावाही बलराजने केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.