Dawood Ibrahim : दाऊदचा ‘अंकल’ भारतातील बनावट नोटांचा वितरक

105
Dawood Ibrahim : दाऊदचा 'अंकल' भारतातील बनावट नोटांचा वितरक
Dawood Ibrahim : दाऊदचा 'अंकल' भारतातील बनावट नोटांचा वितरक

ठाणे पोलिसांनी पकडलेल्या बोगस नोटा प्रकरणात दाऊदच्या ‘अंकल’ चे नाव समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) याप्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात दाऊद टोळीचा जावेद चिकना उर्फ़ अंकल याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. जावेद चिकना हा बोगस नोटा दलालामार्फत ठाण्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींना बोगस नोटांचा पुरवठा करीत होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२१ मध्ये एकाला बोगस नोटाप्रकरणी रियाज अब्दुल शिकीलकर आणि त्याचा भाऊ फैयाज आणि निसार चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ठाणे पोलिसांनी रियाजकडून दोन हजार रुपयांच्या १४९ बनावट चलनी नोटा जप्त केल्या होत्या. तपासात हे प्रकरण दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आल्याने या गुन्ह्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) हाती घेतला होता. या प्रकरणात एनआयएने नुकतेच चार जणांविरुद्ध विशेष एनआयए न्यायालयात आरोप पत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात चौथा आरोपी दाऊद टोळीचा जावेद चिकना उर्फ अंकल याचा उल्लेख केला आहे.

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : विद्यार्थी व लोकसहभागातून गड किल्ले आणि परिसर स्वच्छता मोहीम)

बनावट नोटा प्रकरणात कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह आयएसआय संघटनेचा हात असल्याचे म्हटले आहे. ठाणे पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटा या भारताच्या बाहेर छापून त्या भारतात जावेद पटेल उर्फ चिकना उर्फ अंकल याच्या मार्फत वितरित करण्यात येत असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला निशार चौधरी हा जावेद चिकनाच्या संपर्कात होता व जावेद चिकना हा दलालामार्फत बनावट नोटा चौधरीकडे पाठवत होता. त्या नंतर चौधरी हा या नोटा भारतातील मुख्य बाजारपेठेत वितरीत करण्यासाठी रियाज सारखे एजंटला पाठवत होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.