खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात (Canada) हत्या केल्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानाही अस्वस्थता वाढली होती. त्या अस्वस्थेनंतर त्यांनी थेट भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला. य आरोपानंतर कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध ताणले. आता कॅनडाच्या सैन्याची झोप मोडणारी घटना समोर आली आहे. कॅनेडियन आर्मीच्या अधिकृत वेबसाइटवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यात कॅनडाच्या लष्कराची वेबसाइट काही काळ डाउन झाली होती. तथापि, काही वेळानंतर ही वेबसाइट पुन्हा सुरु झाली. या सायबर हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरले जात आहे. ‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, ‘इंडियन सायबर फोर्स’ या हॅकर ग्रुपने आपल्या सोशल मीडियातील पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र, याबाबत भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
इंडिया सायबर फोर्सने बुधवारी कॅनेडियन (Canada) सशस्त्र दलाची अधिकृत वेबसाइट तात्पुरती बंद केली. यानंतर त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट अपलोड केली, ज्यामध्ये कॅनेडियन वायुसेनेची वेबसाइट आता डाऊन झाल्याचे सांगण्यात आले. हॅकर्स ग्रुपने एक स्क्रीनशॉटही शेअर केला होता, ज्यामध्ये वेबसाइटवर एरर मेसेज दिसत होता. ‘द ग्लोब अँड मेल’च्या रिपोर्टनुसार, असे असूनही, काही डेस्कटॉप वापरकर्ते वेबसाइटवर प्रवेश करू शकत होते, परंतु मोबाइलवर वेबसाइट उघडण्यात त्रुटी दिसून येत होती. ‘द ग्लोब अँड मेल’च्या अहवालानुसार, काही डेस्कटॉप आणि मोबाइल फोन वापरकर्ते साइट पाहू शकले नाहीत. भारतीय सायबर फोर्सने 21 सप्टेंबर रोजी कॅनडाला धमकी दिली होती. सोशल मीडियाद्वारे कॅनेडियन सायबर स्पेसवरील हल्ला अनुभवण्यास तयार राहण्यास सांगितले होते.
(हेही वाचा Muslim : यवतमाळमध्ये शिवरायांच्या पुतळ्यासमोर मुसलमानांनी केली ‘ही’ धर्मांध कृती)
Join Our WhatsApp Community