भारतात मुसळधार पावसाने शहरे पाण्याखाली जाण्याचा प्रकार नित्याचाच आहे, पण जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत (America) अशी स्थिती होणे, आश्चर्य आहे. अमेरिकेत अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्क शहर बुडाले असून प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे.
शहरातील अनेक भुयारी मार्ग, रस्ते आणि महामार्ग पुराच्या पाण्याने वेढले आहेत. तसेच लागार्डिया विमानतळावरील एक टर्मिनल बंद झाले आहे. एका रात्रीत पाच ते आठ इंचाचा पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे अमेरिकेतील (America) न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सांगितले. हे एक धोकादायक, जीवघेणे वादळ आहे, असे ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे मी न्यूयॉर्क शहर, लाँग आयलंड आणि हडसन व्हॅलीमध्ये आणीबाणीची स्थिती घोषित करत आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. तसेच नागरिकांनी पुराचे पाणी असलेल्या भागातून प्रवास करून नये, असे आवाहन हॉचुल यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community