खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला, मात्र जामीन मिळाला असला तरी वाझे तुरुंगाबाहेर येणार नाही, कारण वाझे सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया (Antilia) निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी कोठडीत आहेत. याशिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहाराचाही गुन्हा दाखल आहे.
न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Magistrate Court) या प्रकरणात जामीन देण्यास नकार दिल्यानंतर वाझेने सीबीआय न्यायालयात अर्ज केला होता. ‘माझ्या विरोधातील कलमांन्वये कमाल तीन वर्षांची शिक्षा आहे आणि मी त्यातील अर्ध्या कालावधीचा तुरुंगवास (Imprisonment) भोगला आहे. त्यामुळे मी जामिनासाठी पात्र आहे.’ ,असा वाझेचा युक्तिवाद (Argument) केला होता, तर वाझेवरील आरोप लक्षात घेता कामाल शिक्षा १० वर्षांची असल्याने त्यांनी अर्ध्या कालावधीचा कारावास भोगला असल्याचे म्हणाता येणार नाही, असा युक्तिवाद करत सीबीआयने (CBI) अर्जाला विरोध दर्शवला होता.
(हेही वाचा – Asian Games : भारताचा ७२ वर्षांचा दुष्काळ संपला; गोळाफेकीत कांस्य पदक)
नोव्हेंबर २०२१ पासून वाझे या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत. त्यामुळे शिक्षेच्या एकूण कालावधीपैकी फारच कमी काळ ते कोठडीत आहेत, असा दावाही ( claim) सीबीआयने केला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community