ICC World Cup 2023 : भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज; आजपासून सराव सामना सुरु

184
ICC World Cup 2023 : भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज; आजपासून सराव सामना सुरु

येत्या ५ ऑक्टोबर पासून क्रिकेट विश्वातील सर्वांत मोठ्या स्पर्धेला म्हणजेच (ICC World Cup 2023) वर्ल्ड कप २०२३ ला सुरुवात होत आहे. भारत चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारताने यापूर्वी १९८७, १९९६, आणि २०११ या वर्षी वर्ल्ड कपचे यजमान पद भूषवलं. क्रिकेट विश्वातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी रोहित शर्माचा संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे.

आजपासून म्हणजेच शनिवार ३० सप्टेंबर पासून भारताच्या सराव सामन्यांना (ICC World Cup 2023) सुरुवात होत आहे. टीम इंडियाचा पहिला सराव सामना हा इंग्लंड सोबत खेळाला जाणार आहे. त्यासाठी मेन इन ब्ल्यू म्हणजेच भारताची ब्ल्यू आर्मी गुवाहाटी मध्ये पोहोचली आहे. या सामन्यासाठी आता संघात अक्षर पटेलच्या जागी आर अश्विन खेळणार आहे.

(हेही वाचा – ICC ODI World Cup : अक्षर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश)

३० सप्टेंबरच्या इंग्लंड बरोबरच्या वॉर्मअप मॅच नंतर भारताची दुसरी प्रॅक्टिस मॅच (ICC World Cup 2023) ही ३ ऑक्टोबरला नेदरलँड्स विरुद्ध केरळमधील थीरूअनंतपुरम इथं होणार आहे. त्यानंतर भारताची विश्वचषक मोहीम सुरू होईल ती ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर. तर भारत विरुद्ध पाकिस्तान (ICC World Cup 2023) हा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.