Central Railway: सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

दादर-काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येईल

154
Central Railway: सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
Central Railway: सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

मध्य रेल्वेकडून (Central Railway)  प्रवाशांच्या (Relief to passengers) सोयीसाठी दसरा, दिवाळी आणि छट्पूजेनिमित्त (festivals celebrations) विशेष गाड्यांच्या (special trains) कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी आणि छट्पूजेनिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०७६३८ साईनगर शिर्डी-तिरुपती (Sainagar Shirdi-Tirupati) साप्ताहिक विशेष (Weekly specials) रेल्वे २५ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी २७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०७६३७ तिरुपती साईनगर शिर्डी (Tirupati Sainagar Shirdi) साप्ताहिक विशेष गाडी २४ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी आता १५ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७१९६ दादर-काझीपेठ साप्ताहिक विशेष रेल्वे २८ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. या रेल्वेगाडीचा कालावधी ५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

(हेही पहा – Asian Games : भारताचा ७२ वर्षांचा दुष्काळ संपला; गोळाफेकीत कांस्य पदक)

गाडी क्रमांक ०७१९५ काझीपेठ-दादर साप्ताहिक विशेष (Kazipeth-Dadar weekly special train) २७ सप्टेंबरपर्यंत चालवण्यात आली. ही रेल्वेगाडी ४ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात येईल. गाडी क्रमांक ०७१९८ दादर-काझीपेठ साप्ताहिक विशेष (Dadar-Kazipeth Weekly Special) रेल्वे १ ऑक्टोबरपर्यंत चालवण्यात येईल तसेच ही रेल्वेगाडी ८ ऑक्टोबर ते २६ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०७१९७ काझीपेठ-दादर साप्ताहिक विशेष रेल्वे (Kazipeth-Dadar weekly special train) ३० सप्टेंबरपर्यंत चालवण्यात येईल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.