Monsoon Update : यावर्षी राज्यात झाला सरासरीच्या ९६ टक्के पाऊस

124
Monsoon Update : यावर्षी राज्यात झाला सरासरीच्या ९६ टक्के पाऊस

यावर्षी देशात आणि राज्यात पावसाची हाजरी ५० – ५० टक्के (Monsoon Update) राहिली आहे. मुळातच उशिरा सुरु झालेल्या पावसाने नंतर काहीशी विश्रांती घेतली. संपूर्ण ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यांत खूप कमी पाऊस झाला. अशातच आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ पासून आतापर्यंत राज्यात सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. तर संपूर्ण देशात ९४ टक्के पावसाची नोंद (Monsoon Update) झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

अधिक माहितीनुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांत अधिक पावसाची नोंद (Monsoon Update) झाली आहे. कोकणात सरासरीच्या ११० टक्के, मध्य महाराष्ट्रात ८७ टक्के, मराठवाड्यात ८७ टक्के, आणि विदर्भात ९७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मान्सूनचा परतीचा प्रवास…

हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार २६ सप्टेंबर पासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला (Monsoon Update) सुरुवात झाली असून, उत्तर भारतापासून याची सुरुवात झाली आहे. तसेच राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमनच उशिरा झाल्यामुळे त्याच्या परतीचा प्रवासही (Monsoon Update) उशिराने म्हणजेच १०ऑक्टोबरनंतर सुरु होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.