Noise pollution: विसर्जन गणेशोत्सव मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेने सर्व रेकॉर्ड मोडले !

आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

117
Noise pollution: विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेने सर्व रेकॉर्ड मोडले !
Noise pollution: विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेने सर्व रेकॉर्ड मोडले !

दहा दिवसांच्या आदरातिथ्यानंतर गुरुवारी गणपती बाप्पाला थाटामाटात निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या गणरायाचे वाजतगाजत विसर्जन झाले. मंगलमूर्तीची पाठवणी करताना केलेल्या जल्लोषात सगळ्यात जास्त चर्चा जर कोणत्या विषयाची रंगली असेल, तर ती म्हणजे ध्वनि प्रदूषणाची ! (Noise pollution)

पुणे ३० तास, मुंबई २८ तास, ठाणे १५ तास, नाशिक तास विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. मिरवणुकांसाठी वापरलेल्या वाद्ये ढोल-ताशांचा प्रचंड आवाज, डीजेचा दणदणाट…पुण्यात तर ध्वनिप्रदूषणाची पातळी ११८ डेसिबल (118 decibels) नोंदवण्यात आली. मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर…विशेष म्हणजे अनेक शहरांमधली २४ तासांनंतरही ध्वनि प्रदूषणाची आकडेवारी उघड झाली नाही. विसर्जन मिरवणुकीत पुणे, यवतमाळमध्ये डीजेच्या आवाजामुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर लोणीकाळभोर येथे गणेश दळवी (४४) यांचा डीजेसमोर नाचताना बेशुद्ध पडून मृत्यू झाला. यवतमाळमध्येही डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला.

नियमांचे उल्लंघन
राज्य सरकारने (State Govt ) घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून कर्णभेदक ध्वनि (deafening sound) , ढोलताशांचा आवाज आणि डोळे दिपवणारे प्रखर दिवे हे चित्र सर्वच ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी पाहायला मिळते. ढोल-ताशांच्या पथकावर (Bands of drums) निर्बंध घालूनही विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे, डीजे अशा कर्णभेदक वाद्यांचा वापर सर्रास केला जातो. रुग्णालये किंवा इतर शांतता आवश्यक असणाऱ्या परिसरांबाबत काळजी घेणे आवश्यक असल्याचे कोणाच्याही लक्षात येत नाही.

ध्वनिपातळी ११० डेसिबलपेक्षाही जास्त
पुण्याच्या सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पथकाने गुरुवारी दुपारी चार ते शुक्रवारी सकाळी आठच्या दरम्यान केलेल्या मोजणीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनीची पातळी कमाल ११८.५ डेसिबल नोंदवण्यात आली. ठाण्यात राम मारुती रोड, गोखले रोड, मल्हार सिनेमागृह, विष्णू नगर, साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, चरई, ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी, उपवन, पोखरण रस्ता क्रमांक २, जे. के. शाळा कॅडबरी जंक्शन या परिसरात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाल्याची नोंद, ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी मिरवणुकांदरम्यान केलेल्या आवाजाच्या पातळीच्या यंत्राद्वारे मापन केले आहे. अनेक ठिकाणी ध्वनिपातळी ११० डेसिबलपेक्षाही जास्त असल्याचे पाहायला मिळाले.

आवाजामुळे प्राण्यांना ह्रदयविकाराचा झटका
वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा प्राण्यांनाही त्रास होतो. भीतीने कोपऱ्यात लपून बसणे, आवाज असह्य झाल्याने दुसऱ्या जागी स्थलांतरित होणे, मानवाच्या तुलनेत त्यांना चारपट जास्त आवाज ऐकू येतो, त्यामुळे त्यांनी काळजी घ्यायची आवश्यकता आहे. कानठळ्या बसणाऱ्या आवाजाचा प्राण्यांना त्रास होऊन त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता असते, अशी माहिती प्राणी कल्याण संघटनेचे अधिकारी सुशांक तोमर देतात.

तक्रारी नोंदवण्यात चालढकलपणा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार, दिवसा निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात ४५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७० डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही यासंदर्भात काटेकोर नियमावली आखून दिली आहे तसेच आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात येतात, मात्र मुंबईसह अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची नोंद शुक्रवारपर्यंतही करण्यात आली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.