होआंगझाओ इथं सुरू असलेल्या आशियाई खेळांचा (Asian Games 2023) आज म्हणजेच शनिवार ३० सप्टेंबर हा सातवा दिवस आहे. अशातच आज दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने पुन्हा एकदा नेमबाजी या क्रीडा प्रकारात पदक पटकावले आहे. १० मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरी संघाने १३ वे रौप्य पदक मिळवले आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत ८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १३ कांस्य अशी एकूण ३४ पदकं आहेत.
ASIAN GAMES 2023: Another Silver 🥈 for India in #shooting
Divya TS and Sarabjot Singh return with the silver medal in the 10m Air Pistol Mixed Team final.#AsianGames #AsianGames2022 #asiangames2023 #india #GameOn #AajNEWJDekhaKya pic.twitter.com/zeVq0qCuFC
— Game On (@gameonbynewj) September 30, 2023
अधिक माहितीनुसार, सामन्याच्या सुरुवातीला (Asian Games 2023) सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी चीनला नमवत ४ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र कालांतराने १६ – १४ अशा गुणांनी चीनने सुवर्ण पदक जिंकले. आणि सरबजोत सिंह आणि दिव्या यांनी रौप्य पदक जिंकले आहे.
(हेही वाचा – ICC World Cup 2023 : भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज; आजपासून सराव सामना सुरु)
भारताने आतापर्यंत (Asian Games 2023) नेमबाजी या स्पर्धेत 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्यपदकांसह 19 पदके जिंकली आहेत. सरबजोत ने २९१, तर दिव्याने २८६ गन मिळवून एकूण ५७७ गुणांची भागीदारी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community