Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण, शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन

143
Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण, शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन
Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण, शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन

लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ साली पहाटे ३.५६ वाजता ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या धक्क्यात ८ हजार लोक प्रणास मुकले. १६ हजारांहून जास्त लोक जखमी झाले. १५ हजारांपेक्षा जास्त पशुधनाचे नुकसान झाले. काही सेकंदातच ५२ खेडेगावातील ३० हजारांच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. अनेकांचे संसार मातीखाली गाढले गेले… कुटुंबातली आपली माणसं गमावली… गुरंढोरं गेली… ११ जिल्ह्यांना या भूकंपाचा फटका बसला. आजही येथील नागरिकांच्या मनात आणि जिल्ह्यात या भूकंपाच्या खुणा ताज्या आहेत. दरवर्षी ३० सप्टेंबरला या भूकंपाची आठवण ताजी होत असते. आजही अनेक अश्रू अनावर होतात. आज या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.

दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशीही भूकंपामध्ये मृत्यू पावलेल्यांचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. शिवाय किल्लारी येथे शरद पवार (Sharad Pawar)  यांच्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. १९९३ मध्ये ज्यावेळी भूकंपाची  घटना घडली तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचं नियोजन आणि कामाच्या झपाट्यामुळे किल्लारीसह (Killari earthquake) ५२ गावे या धक्क्यातून सावरली गेली.

कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन
त्यांनी किल्लीरी भूकंपग्रस्तांना खूप मदत केली. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. संपूर्ण गाव विकसित करण्यासाठी, पुनर्वसनासाठी (Rehabilitation) प्रशासन कामाला लागले. गावांचे स्थलांतर, नवीन घर बांधणी, पीडितांचे आर्थिक नुकसान भरून काढणे, नोकरीत मुलांना सवलत, बाजारपेठा, सामाजिक, आर्थिक स्तर सुधरवणे…अशा सर्व स्तरांवर मदतीचा ओघ सुरू झाला. ५२ गावांत शरद पवार अनेक वेळा स्वत: गेले. जागतिक संस्था, स्वयंसेवी संस्थांची मदत घेत आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले. त्यामुळे त्या काळी शरद पवार यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता (gratitude ceremony) व्यक्त करण्यासाठी आज किल्लारी येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.