Manipur : मणिपूरमधील विद्यार्थी करत आहेत मूक निदर्शने; काय आहेत मागण्या…

156
Manipur : मणिपूरमधील विद्यार्थी करत आहेत मूक निदर्शने; काय आहेत मागण्या...
Manipur : मणिपूरमधील विद्यार्थी करत आहेत मूक निदर्शने; काय आहेत मागण्या...Manipur : मणिपूरमधील विद्यार्थी करत आहेत मूक निदर्शने; काय आहेत मागण्या...

जुलै महिन्यापासून मणिपूरमधील २ विद्यार्थी बेपत्ता आहेत. (Manipur) काही दिवसांपूर्वी त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर पुन्हा हिंसाचार उसळला आहे. येथे 4 दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. मणिपूरमधील इंटरनेट बंदीच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. या प्रकरणी केंद्रीय कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनीही मूक आंदोलन केले. त्या सर्वांनी फलक घेतले होते. ‘इंटरनेटबंदी हा मणिपूर समस्येवर उपाय नाही’, असे त्यावर लिहिले होते. आंदोलक हल्ला करण्यासाठी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचले, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. (Manipur)

(हेही वाचा – Killari Earthquake : किल्लारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण, शरद पवार यांच्याप्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन)

आवश्यक वस्तू आणि औषधे खरेदी करण्यासाठी इंफाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमध्ये पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत कर्फ्यू शिथिल करण्यात आला होता; परंतु गर्दी जमवण्यास मनाई होती. संतप्त जमावाने मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या खाजगी घरावर हल्ला करण्यासाठी इंफाळ गाठले; पोलिसांनी त्यांना घराच्या 500 मीटर आधी अडवले. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना हुसकावून लावले. सध्या मुख्यमंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या भागात हिंसाचार उसळला आहे, त्या भागांना मणिपूर सरकारने ‘शांततापूर्ण क्षेत्र’ घोषित केले आहे. (Manipur)

भाजप कार्यालयाला सुरक्षा 

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता भाजपच्या इंफाळमधील भाजप कार्यालयावर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी जलद कृती दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (आरएएफ) तैनात करण्यात आले आहे. 27 सप्टेंबर रोजी थौबल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला जमावाने आग लावली होती. याशिवाय इंफाळमध्ये भाजप अध्यक्षा शारदादेवी यांच्या घराचीही तोडफोड करण्यात आली. यापूर्वी आंदोलकांनी थोबुल जिल्ह्यातील भाजप कार्यालयाला आग लावली. दुसरीकडे, इंफाळमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष शारदा देवी यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. याशिवाय इंफाळ पश्चिम येथील उपजिल्हाधिकार्‍यांच्या घराची जाळपोळ करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. (Manipur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.