Gas Pipelines : घरांना गॅस पाईपलाईन पुरवठा करणारं ‘हे’ ठरलं पहिलं गाव, जाणून घ्या

संपूर्ण गावातील धूर हद्दपार झाला याचा विशेष आनंद

164
Gas Pipelines : घरांना गॅस पाईपलाईन पुरवठा करणारं 'हे' ठरलं पहिलं गाव, जाणून घ्या
Gas Pipelines : घरांना गॅस पाईपलाईन पुरवठा करणारं 'हे' ठरलं पहिलं गाव, जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील घरांना गॅस पाईपलाईनद्वारे (Gas pipelines) पुरवठा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाईपने गॅस पुरवठा (Gas supply) करणारं महाराष्ट्रातलं (Maharashtra) हे पहिलंच गाव ठरलं आहे.

या गावात २ हजार लोकवस्ती आहे. छत्रपती संभाजीनगरपासून २२ किलोमीटर अंतरावर लाडगाव (Ladgaon) वसलं आहे. या गावातील महिला कधीकाळी चुलीवर स्वयंपाक करायच्या. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे वगळता कोणत्याही शहरांमध्ये गॅस पुरवठा होत नाही, असे असूनही गावात होणाऱ्या गॅस पाइपलाइन पुरवठ्यामुळे या गावाने नवीन आदर्श घालून दिला. यापुढे गावातील मातीच्या घरात आता गॅस कनेक्शन पाहायला मिळेल.

गावातील नागरिकांना ७० रुपये किलोने सिलेंडरद्वारे मिळणारा गॅस फक्त ३५ ते ४० रुपये किलोने मिळणार आहे. गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे शिवाय मोठ्या शहरांतही काही ठिकाणी गॅस पाइपलाइन अजून पोहोचलेली नाही, त्यातच गॅसची लाइन लाडगावापर्यंत पोहोचली आहे. लाडगावातील ३८० घरांत गॅस पाइपलाइनने पुरवठा सुरू केला आहे. या योजनेमुळे संपूर्ण गावातील धूर हद्दपार झाला याचा विशेष आनंद होत आहे, अशी माहिती गावातील नागरिकांनी दिली आहे.

हे कसं शक्य झालं?
गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर एलएनजी अर्थात लिक्विफाइड नॅचरल गॅसचा (Liquefied Natural Gas)प्लांट आहे. या प्लांटवर गुजरातहून एलएनजी गॅस (LNG gas) आणला जातो. त्याच्या माध्यमातून सीएनजी आणि पीएनजी गॅस तयार होतो. हा गॅस कंपनीने पाईपलाईनद्वारे वितरित करायचे ठरवले. गावातील महिला सरपंचांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला. यामुळे गावकऱ्यांच्या घरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होऊ शकला. ‘हर घर गॅस का नल’ या योजनेद्वारे संभाजीनगरमधील लाडगावात महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.