Health Tips : आंबट दही आरोग्यासाठी फायदेशीर का ? वाचा सविस्तर

164
Health Tips : आंबट दही आरोग्यासाठी फायदेशीर का ? वाचा सविस्तर
Health Tips : आंबट दही आरोग्यासाठी फायदेशीर का ? वाचा सविस्तर

दह्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, साखर, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे घडक असतात. त्यामुळे संतुलित आहारात दह्याचा समवेश केल्यास शरीराला फायदा होतो. दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर (beneficial for health) ठरते. यामुळे पोटाच्या तक्रारींवरही फायदा होतो. दही शक्यतो रात्री खाऊ नये. यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो. दही खाण्याचे अनेक फायदे बऱ्याच जणांना माहित असतात, आंबट दही (sour curd) खाण्याचे फायदे (Health Tips) माहीत असतीलच नाही. जाणून घेऊया, आंबट दही खाण्याचे फायदे –

आंबट दह्यामध्ये प्रोबायोटिक्सचा नैसर्गिक स्त्रोत (source of probiotics) असतो. यामध्ये निरोगी बॅक्टेरिया (Healthy bacteria) असतात जे आतड्यांसाठी फायदेशीर ठरतात. प्रोबायोटिक्समुळे पचन सुधारते. बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या दूर होते.

  • दह्यामध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढवण्याचे गुणधर्म असतात. यामधील पोषक तत्त्वांमुळे हाडे मजबूत राहतात आणि रोगप्रतिकारक्षमता वाढते. (Increases immunity) दह्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्व डी, बी १२, प्रथिने आणि पोटॅशियम यासारखे पौष्टिक घटक असतात. आंबट दह्यातील प्रोबायोटिक्समुळे लॅक्टोजच्या पचनास मदत करू शकतात. यामुळे आतड्यातील बॅक्टेरियाचे संतुलन राखले जाते.

(हेही वाचा – Mumbai Crime : डीआयआरच्या कार्यालयातून सोने तस्कर मेहुल जैनचे कागदपत्रांसह पलायन)

  • वजनवाढीवर नियंत्रण (Control of weight gain) मिळवण्यासाठी आंबट दही खावे. यामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे अनावश्यक जास्त खाल्ले जात नाही. वजन संतुलित राहते.
  • पोटातील जळजळ, चेहऱ्यावरील मुरुमं, पुटकुळ्या दह्यामुळे कमी व्हायला मदत होते. शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
  • दह्यामध्ये अँण्टीऑक्सिडंट्स असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावांपासून पेशींचे रक्षण करण्यास मदत करतात. ऑक्सिडेटिव्ह तणाव ही वृद्धत्वाची प्रक्रिया आहे. दह्याचे सेवन केल्याने जुने आजार पुन्हा होण्याचा धोका कमी होतो. आरोग्यातही सुधारणा होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.