Khalistan Supporters In UK : यूकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश नाकारला; काय आहे घटना 

युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना 29 सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. काही लोकांनी अधिकाऱ्यांना प्रवेश नसल्याचे सांगितले. यानंतर अधिकारी निघून गेले.

137
Khalistan Supporters In UK : यूकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश नाकारला; काय आहे घटना 
Khalistan Supporters In UK : यूकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश नाकारला; काय आहे घटना 

यूकेमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांची अल्बर्ट ड्राइव्हवरील ग्लासगो गुरुद्वाराच्या गुरुद्वारा समितीसोबत बैठक होणारी बैठक रहित झाली आहे. (Khalistan Supporters In UK) खलिस्तान समर्थकांनी गुरुद्वारात प्रवेश करू दिला नाही. युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना 29 सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. काही लोकांनी अधिकाऱ्यांना प्रवेश नसल्याचे सांगितले. यानंतर अधिकारी निघून गेले. किरकोळ बाचाबाची झाली. ब्रिटनमधील कोणत्याही गुरुद्वारामध्ये भारतीय अधिकाऱ्यांचे स्वागत होत नाही. या घटनेशी संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  (Khalistan Supporters In UK)

(हेही वाचा – Mumbai Crime : डीआयआरच्या कार्यालयातून सोने तस्कर मेहुल जैनचे कागदपत्रांसह पलायन)

या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की, दोन कामगार कार पार्किंगमध्ये उच्चायुक्तांच्या कारजवळ येतात आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते आतून बंद होते. यानंतर कार मागे वळते आणि निघून जाते. या प्रसंगात गुरुद्वारा व्यवस्थापनाचे सदस्यही हस्तक्षेप करत नाहीत. (Khalistan Supporters In UK)

जुलैमध्ये खलिस्तान समर्थकांकडून युनायटेड किंगडममधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी  मार्चमध्ये ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये असलेल्या भारतीय उच्चायुक्तांच्या इमारतीवरही हल्ला झाला होता. खलिस्तानचा झेंडा घेऊन येथे आलेल्या जमावाने इमारतीवरही हल्ला केला. खलिस्तानचा झेंडा घेऊन येथे आलेल्या जमावाने उच्चायुक्तालयाच्या इमारतीवरून भारतीय ध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर भारतानेही ब्रिटनकडे तीव्र निषेध नोंदवला होता.

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात वाद सुरू असताना ही घटना घडली आहे. ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे १८ जून रोजी निज्जरची हत्या करण्यात आली होती. 2020 मध्ये भारताने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे. भारताने हे आरोप परतवून लावले आहेत. (Khalistan Supporters In UK)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.