Iit Canteen : आयआयटी कँण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची स्वतंत्र सोय, मेस काउन्सिलकडून उपाययोजना

नियमाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे

123
Iit Canteen : आयआयटी कँण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची स्वतंत्र सोय, मेस काउन्सिलकडून उपाययोजना
Iit Canteen : आयआयटी कँण्टीनमध्ये शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची स्वतंत्र सोय, मेस काउन्सिलकडून उपाययोजना

मुंबईच्या आयआयटी कँण्टीनमध्ये (Iit Canteen) शाकाहारींसाठी (Vegetarians) स्वतंत्र टेबलाची व्यवस्था करण्यात आली आहे. आयआयटी प्रशासनाने (IIT Administration) शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कॅंण्टीनमध्ये स्वतंत्र टेबल राखीव (Reserve separate table) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जुलै महिन्यात आयआयटी वसतिगृह १२च्या कँण्टिनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. या कँण्टिनमध्ये फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असलेली पत्रके लावण्यात आली होती. या भित्तीपत्रकाची छायाचित्रे सोशल मिडियावर (Social media) व्हायरल (Viral) झाल्याने खळबळ उडाली. याबाबत मेस कौन्सिलकडून ( Mess Council) विद्यार्थ्यांना ई-मेल पाठवण्यात आला होता.

या ई-मेलमध्ये लिहिले होते की, कँण्टिनमध्ये जेवताना मांसाहारी भोजन पाहून किंवा त्याचा वास काहींना सहन होत नाही. त्यामुळे प्रकृती बिघडल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे कॅंण्टीनमध्ये शाकाहारी असणाऱ्यांसाठी सहा वेगळे टेबल्स असण्याची गरजेचे आहे. यासंदर्भातील ईमेल वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर (Email Warden, Member of Mess, Mess Councillor ) यांनाही पाठवण्यात आले आहे.

(हेही वाचा – Navi Mumbai Air Pollution : नवीमुंबई पनवेलकर प्रदूषित हवेच्या विळख्यात )

मात्र शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र टेबलाची सोय करण्यात आली असली तरीही या कृतीमुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मेस काउन्सिलकडून विद्यार्थ्यांना सुविधा…
आयआयटीच्या कॉमन कँण्टीनमध्ये ८० ते १०० टेबल असून ६ टेबल शाकाहारींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. एका व्यक्तिसाठी प्रत्येकी आठ जण बसू शकतात. शाकाहारी टेबलांना विशिष्ट प्रकारच्या खुणा करण्यात आल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.