Central Railway : ७ मिनिटांत करण्यात आली रेल्वेची स्वच्छता; मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी

147
Central Railway : ७ मिनिटांत करण्यात आली रेल्वेची स्वच्छता; मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी
Central Railway : ७ मिनिटांत करण्यात आली रेल्वेची स्वच्छता; मध्य रेल्वेची उल्लेखनीय कामगिरी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे सफाईच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. (Central Railway) विभागाने ट्रेन क्रमांक 17222 ‘लोकमान्य टिळक टर्मिनस – काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस’ची साफसफाई अभूतपूर्व ७ मिनिटांच्या कालावधीत यशस्वीरित्या केली. या वेळी जपानी शिंकानसेन (बुलेट ट्रेन)च्या ‘७ मिनिटांच्या क्लीनिंग मिरॅकल’ धर्तीवर एक नवीन मानक स्थापित केले जाते. (Central Railway)

(हेही वाचा – Emergency in New York : न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी; 20 तास सतर्कतेचा इशारा)

‘स्वच्छता पंधरवडा मोहीम २०२३’चा एक भाग म्हणून ही मोहिम राबवण्यात आली. स्वच्छता आणि प्रवाशांच्या समाधानासाठी मध्य रेल्वे वचनबद्ध आहे. या चाचणीमध्ये कॅरेज आणि वॅगन (C&W), रेल्वे संरक्षण दल (RPF), अभियांत्रिकी आणि वाणिज्यिक यासह विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. २० डब्यांची ही ट्रेन सकाळी ११:१८ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर पोहोचली आणि स्वच्छता मोहिम सुरू झाली. सुरक्षा कर्मचाऱ्याच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे सकाळी ११:३० पर्यंत प्रवाशांना पूर्णपणे उतरवले. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना ११:३१ वाजता तात्काळ स्वच्छता सुरू करता आली. त्यानंतर ट्रेन सकाळी ११:३९ पर्यंत प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यासाठी सज्ज झाले. (Central Railway)

येथे करण्यात आली स्वच्छता 
  • कोचच्या आतील भागात कोरडी साफसफाई करणे आणि कचरा पॉली बॅगमध्ये गोळा करणे आणि डस्ट बिनमध्ये टाकणे
  • टॉयलेटच्या फरशीचे स्क्रबिंग आणि मोपिंग
  • शौचालयाच्या आतील आणि बाहेरील सर्व आरसे आणि वॉशबेसिनची स्वच्छता
  • दरवाजा, वेस्टिब्युल एरिया आणि फॉल प्लेट्स साफ करणे आणि पुसणे
  • संपूर्ण फ्लोर एरीया साफ करणे आणि पुसणे
  • सर्व डब्यांमध्ये दुर्गंधीनाशक (R5) फवारणी
  • क्लिनिंग एजंटने एसी खिडकीचे ग्लास आतून आणि बाहेरून पुसणे
  • एसी डब्यांसह सर्व डब्यांमधून आणि वॉश बेसिनच्या खाली जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे.
  • सर्व सीट/बर्थची धूळ
  • सर्व डब्यांमध्ये फ्लॅप टेबल साफ करणे आणि पुसणे

या चाचणीची यशस्वी अंमलबजावणी ११० सफाई कर्मचारी, ११ सुरक्षा कर्मचारी, ६ वाणिज्यिक कर्मचारी आणि २ बांधकाम कार्य निरीक्षक (IoW) कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले. (Central Railway)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.