Bangladesh : बांगलादेशात मंदिरांवरील हल्ल्यांत वाढ; नवरात्रीमध्ये हिंदूंची वाढणार चिंता

या हल्ल्यात श्री दुर्गा (Shri Durga Devi) देवीच्या मूर्ती फोडल्या.

120

बांगलादेशात (Bangladesh) सध्या सार्वत्रिक निवडणूक चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या ठिकाणी राजकारण चांगलेच तापले आहे. या ठिकाणी मुसलमानांच्या (Muslim) एक गठ्ठा मतांसाठी हिंदूंवर अत्याचार करण्याची प्रथाच सुरु आहे. त्यानुसारच आता बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले वाढले आहेत. मागील वर्षी हिंदूंच्या मंदिरांवर १५ हल्ले झाले. या महिन्यात ३ हल्ले आहेत.

या हल्ल्यात श्री दुर्गा (Shri Durga Devi) देवीच्या मूर्ती फोडल्या. मंदिरांवरील हल्ल्यामागे कट्टरवादी संघटना हिफाजत-ए-इस्लाम व जमातचा हात असल्याचा आरोप हिंदू (Hindu) अल्पसंख्याक संघटनेने केला आहे. बांगलादेश (Bangladesh) पूजा समितीचे उपाध्यक्ष महेंद्रकुमार नाथ म्हणाले, 14 ऑक्टोबरपासून दुर्गापूजन आहे. परंतु सव्वा कोटीहून जास्त हिंदूंना नवरात्रीत श्री दुर्गापूजा कशी करायची याची चिंता वाटू लागली आहे. देशात यंदा ३२ हजारांहून जास्त मंडप सज्ज आहेत. निवडणुकीच्या वर्षात मतांच्या ध्रुवीकरणासाठी कट्टरवादी संघटनांना हल्ल्यासाठी उचकवले जात आहे.
निवडणुकीत अल्पसंख्यांक हिंदु (Hindu) घाबरुन जावेत आणि ते मतदानापासून दूर जावेत यासाठी हे हल्ले होऊ लागले आहेत, असे बोलले जात आहे. रंगपूर जिल्ह्यातील रहिवासी जोई सरकार म्हणाले, बांगलादेशातील लोकसंख्येत हिंदू केवळ ८ टक्के आहेत. सरकार आमच्या सुरक्षेबद्दल गंभीर नसते. चांदपूर येथील कुटुंबातील इतर सदस्यही घाबरले आहेत. काही भागांत हिंसाचार सुरू झाला आहे.

(हेही वाचा Khalistan Supporters In UK : यूकेमध्ये भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारात प्रवेश नाकारला; काय आहे घटना )

मूर्तीची विटंबना, मंदिराचीही तोडफोड

फरीदपूरमध्ये 19 सप्टेंबरला मूर्तिकार सकाळी परतले. तेव्हा त्यांनी बनवलेल्या दुर्गा मूर्ती खंडित अवस्थेत दिसून आल्या. शेरपूर व रामेश्वरमध्येही 17 सप्टेंबरला दुर्गा मंदिरात तोडफोड झाली होती. यंदा फेब्रुवारीपासून मंदिरांवर हल्ल्यांची सुरुवात झाली. ठाकूरगावात एकाच रात्री 14 मंदिरांवर हल्ला झाला होता. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी कोणालाही अटक केलेली नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.